Udayanraje Bhosale esakal
सातारा

Satara: उदयनराजेंकडे केंद्रात लवकरच मोठी जबाबदारी; गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांची माहिती

गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा; राजघराण्याकडून झालेल्या स्वागताने भारावले

रुपेश नामदास

Udayanraje Bhosale: खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी झालेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. छत्रपतींच्या घराण्यातून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.

आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले यांना आम्ही खूप मोठी जबाबदारी देणार आहोत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी आज या वेळी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री मिश्रा हे दोन दिवसांच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मंत्री मिश्रा यांचे औक्षण केले.

खासदार उदयनराजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि सातारी कंदी पेढे देऊन स्वागत केले. मंत्री मिश्रा यांनी त्यानंतर येथील भवानी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. राजघराण्याकडून झालेल्या स्वागताने मिश्रा भारावून गेले. या वेळी राजमाता कल्पनाराजे भोसले व उदयनराजे यांच्यासोबत श्री. मिश्रा यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, धैर्यशील कदम, सुनील काटकर, पंकज चव्हाण, गीतांजली कदम, रंजना रावत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी अजयकुमार मिश्रा म्हणाले, ‘‘ज्या घराण्यावर संपूर्ण जग प्रेम करते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडून आम्ही चांगले काम करण्याची नेहमीच प्रेरणा घेत असतो. अशा घराण्याकडून झालेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे.

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. आज आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले यांना आम्ही खूप मोठी जबाबदारी देणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

Nagpur Court: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या 302 विशेष गाड्या जाहीर; मुंबई, पुणे येथून कोकणासाठी स्पेशल ट्रेन

SCROLL FOR NEXT