patan 
सातारा

वांग नदीवरील पूल पाण्याखाली; 25 गावांतील वाहतूक ठप्प

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) ः अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांना जोडणारा आणि गतवर्षी पुराच्या तडाख्याने तुटल्यानंतर भरावाच्या मलमपट्टीने सांधलेला पवारवाडी (ता. पाटण) येथील वांग नदीवरील पूल पावसाचा जोर वाढल्याने आज सकाळी पाण्याखाली गेला. निवी, कसणी, निगडे, घोटीलसह 25 वाड्या-वस्त्यांचे दळणवळण ठप्प झाले असून डोंगर भागात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच उभ्या राहिलेल्या या संकटामुळे जनतेच्या काळजीत आणखीनच भर पडली आहे. 

सांगली व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या निवी-कसणीसह त्या परिसरातील 25 वाड्या-वस्त्यांसाठी पवारवाडी-कसणी-निगडे-म्हाईंगडेवाडी हा वाहतुकीचा एकमेव मार्ग आहे. मात्र, वांग नदीवरील पवारवाडीजवळचा कमी उंचीचा पूल पावसाळ्यात पाण्याखाली गेल्यावर दुर्गम गावांकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. गेल्यावर्षी पुराच्या तडाख्याने पवारवाडीच्या पुलाचा भराव तुटल्याने अनेक दिवस वाहतूक ठप्प झाली होती. कसणीत गेलेली मुक्कामी एसटी बस 12 दिवस चालक-वाहकांसह तिकडेच अडकून पडली होती. त्यानंतर दोन वेळा तुटलेल्या पुलावर मुरमाचा भराव टाकण्यात आला. मात्र, गेल्या वर्षभरात नवीन उंच पुलाच्या बांधकामाचे घोंगडे तसेच भिजत पडल्याने यावर्षीच्या पावसाळ्यातही मूळ समस्या तशीच कायम राहिली आहे. 

या परिसरात पावसाचा जोर वाढला असून वांग नदी दुथडी भरून वाहत आहे. आज सकाळपासून पवारवाडीच्या पुलावर पाणी यायला सुरवात झाली. नऊनंतर पूल पाण्याखाली जावून वाहतूक ठप्प झाली. ये-जा करणारी वाहने, नागरिक, पादचारी, प्रवासी पुलाच्या दुतर्फा अडकून पडले. काही जण जीव धोक्‍यात घालून पुरातून पूल ओलांडायचा प्रयत्न करत होते. मात्र, नागरिकांनी त्यांना रोखले. सध्या कसणी, घोटील, निगडे परिसरात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच दळणवळण ठप्प झाल्याने जनतेच्या काळजीत आणखीनच भर पडली आहे. 


कसणीसह परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने वैद्यकीय व अन्य तातडीच्या सेवांसाठी दळणवळण संपर्क टिकून राहणे गरजेचे आहे. मात्र, सध्या पवारवाडी-कसणी मार्गावरील पूल पाण्याखाली असल्याने आम्ही सारेच काळजीत आहोत. 

- मीनल मस्कर, सरपंच, कसणी 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT