Crime sakal
सातारा

सातारा : धाकट्याकडून थोरल्याचा वरकुटे मलवडीत खून; भावासह पुतण्या ताब्यात

ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यास आडकाठी केल्याच्या रागातून धाकटा भाऊ व त्याच्या मुलाने थोरल्या भावाचा खून केल्याची घटना घडली .

रुपेश कदम ः सकाळ वृत्तसेवा

दहिवडी : ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यास आडकाठी केल्याच्या रागातून धाकटा भाऊ व त्याच्या मुलाने थोरल्या भावाचा खून केल्याची घटना वरकुटे-मलवडी (ता. माण) येथे घडली आहे. आण्णा धुळा वाघमोडे (वय ७५) असे मृताचे नाव असून मारुती वाघमोडे व आबा वाघमोडे या बाप-लेकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरकुटे-मलवडीतील वाघमोडे वस्तीवरील आण्णा धुळा वाघमोडे (वय ७५) हे पोळ-फडतरे वस्तीच्या बंधाऱ्यानजीक गावंदर नावाच्या शिवारात ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री दोन वाजता वीज येणार असल्याने ते ज्वारीच्या शेतातच झोपले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास मारुती धुळा वाघमोडे व आबा मारुती वाघमोडे हे बाप-लेक तेथे आले. त्यांनी आण्णा यांना झोपेतून उठविले. ‘आम्हाला शेतातून पाणी नेऊ दे’ असे ते बोलले. पण, पाणी नेण्यास आण्णांनी नकार दिला. त्याचा राग आल्याने मारुती व आबा यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या कुऱ्हाड, काठी तसेच दगडाने आण्णांना जबर मारहाण केली. त्यात आण्णांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद सदाशिव आण्णा वाघमोडे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली. पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख व म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी घटनास्थळी भेट देत संशयित मारुती वाघमोडे व आबा वाघमोडे यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास बाजीराव ढेकळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT