koregaon 
सातारा

मायलेकच काेराेना बाधित झाल्याने या गावात चिंता

राहूल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : येथे निकट सहवासातून मायलेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून येथील बाजारपेठ आठ दिवस संपूर्ण बंद ठेऊन लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामदक्षता समितीने घेतला आहे. 

संबंधित महिला 47 वर्षांची असून, ती दहावीची परीक्षा दिलेला 15 वर्षांचा मुलगा व पतीसह दहा दिवसांपूर्वी माहेरी एकसळला (ता. कोरेगाव) आजारी असणाऱ्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. दोन दिवस मुक्काम करून पुन्हा सर्वजण गावी आले. त्यानंतर काही दिवसांत मुलाला ताप येऊ लागल्यानंतर प्राथमिक उपचारही घेण्यात आले. मात्र, संबंधित महिलेलाही त्रास जाणवू लागला. हे सर्व जण पाहायला गेलेल्या वडिलांचा रिपोर्ट आठ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांचे निकट सहवासित म्हणून गुरुवारी या मायलेकांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठवण्यात आले. काल रात्री संबंधित महिला आणि मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आणि ग्रामस्थांच्या काळजाचा ठेका चुकला. या कुटुंबाच्या सहवासात अनेक जण आल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकाच घरातील दोन बाधित आढळल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. या मुलगा आणि महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. घरातील निकटवर्तीय असणारे पती आणि सासरे यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून, त्यांना कोरेगाव येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

प्रशासनाकडून या कुटुंबाच्या घरापासून 250 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे. तब्बल महिनाभराने गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने, तसेच खरेदीच्या नावाखाली विनाकारण गर्दी होत असल्याने आजपासून रविवारपर्यंत (ता. 19) संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय ग्राम दक्षता समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यातून जीवनावश्‍यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. अत्यावश्‍यक सेवेतील दवाखाने व मेडिकल सुरू राहणार आहेत. सोमवारी (ता. 20) परिस्थिती पाहून लॉकडाउन उठवण्यासंदर्भात पुढील निर्णय होणार आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार रोहिणी शिंदे यांनी केले आहे. यापूर्वी गावात मुंबईहून आलेले दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर मागील तीन आठवड्यांत तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. हे मायलेक कोणा कोणाच्या संपर्कात आले याची चौकशी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

SCROLL FOR NEXT