man 
सातारा

"हे' गाव टॅंकरमुक्त... आता वृक्ष लागवडीचा ध्यास!

सकाळ वृत्तसेवा

कुकुडवाड (जि. सातारा) : शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून विरळीतील तरुणांनाही 355 पिंपरण रोपांची लागवड केली. विरळी येथील उजाड आणि बोडक्‍या डोंगरावर गावातील नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ आणि विरळी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरक्षित अंतराचे पालन करत लागवड करण्यात आली. 

मागील दोन वर्षांपूर्वीपासून चालत आलेली जलसंधारणाची चळवळ या वर्षी कोरोनामुळे काहीशा प्रमाणात थंडावली असली तरी विरळी हे गाव टॅंकरमुक्त झाले आहे. गावातील डोंगर झाडावाचून भकास आणि बोडके दिसत असल्याने गावातील तरुणांनी यावर्षी वृक्ष चळवळ हाती घेऊन जवळजवळ 355 पिंपरणीची रोपे लावून शिवराज्याभिषेक आणि पर्यावरण दिन साजरा करत समाजापुढे आदर्श निर्माण केला. 

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे, असे सरपंच प्रशांत गोरड यांनी नमूद केले. श्री. गंबरे म्हणाले, ""निसर्ग मानवाला खूप काही देतो, याची जाण ठेवत प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे. वृक्ष लागवड हा विकासाचाच एक भाग आहे.'' 

यावेळी दत्ता नलवडे, मंडळाचे अध्यक्ष रामदास नलावडे, ग्रामसेवक गंबरे, सदस्य विकास केंगार, प्रकाश गोरड, डॉ. प्रशांत घुटुकडे, पोपट जाधव, बाळासाहेब गोरड, गणेश नलावडे, अंकुश नलावडे, मंडळातील कार्यकर्ते व वृक्षप्रेमी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT