बोंडारवाडी Sakal
सातारा

सातारा : बोंडारवाडी धरणाचा प्रश्‍न वर्षभरात सोडवू - भारत पाटणकर

७५ वर्षे झाली तरी जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे.

संदीप गाडवे

केळघर : मेढा-केळघर विभागातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्त्‍वाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने बोंडारवाडी धरणाचा प्रश्न एक वर्षाच्या आत सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने नांदगणे येथे ५४ गावांतील ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यकारिणी सदस्य चैतन्य दळवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित कदम, भाऊसाहेब उभे, एकनाथ ओंबळे, राजेंद्र धनावडे, आनंदराव जुनघरे, आनंदराव सपकाळ उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागास बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव सादर करायला सांगितले होते. २० डिसेंबरपर्यंत प्रस्तावाची वाट पाहणार आहे. अहवाल वेळेत न झाल्यास श्रमिक मुक्ती दल तीव्र लढा उभारेल. या प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन व इतर आवश्यक बाबींसाठी पाठपुरावा करू. हे धरण रखडल्याने ५४ गावांतील युवक रोजगारासाठी मुंबई व पुण्याचा रस्ता पकडत आहेत. हा प्रकल्प झाल्यास स्थलांतर थांबेल. कण्हेर धरणाच्या राखीव ६ टक्के पाणीसाठ्यातून हा प्रकल्प मार्गी लागेल.

५४ गावांतील दहा हजार कुटुंबांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. आतापर्यंत कोयना व चांदोली धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंबंधी श्रमिक मुक्ती दलाने यशस्वी पाठपुरावा केला असून बोंडारवाडी धरण पूर्ण होण्यासाठी लोकसहभागातून लढा उभारला असून हा प्रकल्प निश्चित मार्गी लागेल.’’ दुष्काळी तालुक्यात ‘आटपाडी पॅटर्न’ राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. विजयराव मोकाशी यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT