लोहारवाडी (काळगाव, ता.पाटण) 
सातारा

मित्रा तू तर आमचा कणा, गावही सुना तुझ्याविना

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) : अपवाद वगळता पाटण तालुक्‍यातील जवळपास सर्वच गावातील बहुसंख्य नागरिक नोकरी व्यवसायनिमित्ताने मुंबईला वास्तव्याला आहेत. यात्रा, सण-उत्सव, लग्न समारंभ आणि सुख दुःखाच्या प्रसंगात गावाकडे येणाऱ्या मुंबईकरांचे गावच्या विविध उपक्रमातून मोठे योगदान लाभत असल्याने गावचा माणूस मुंबईकरांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला असतो.

अलीकडे मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्यात अंतर पडल्याचे चित्र गावागावात दृष्टीला पडत आहे. गावी परतलेल्या मुंबईकरांना प्राथमिक शाळांत किंवा त्यांच्या घरी क्‍वॉरंटाईन केले जात आहे. परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांत सापडलेले कोरोनाबाधीत रुग्ण विलगीकरणात ठेवलेले मुंबई रिटर्न असल्याने गावागावात भितीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर आणि स्थानिक गावकऱ्यात अंतर वाढत चालल्याने पुढे कोरोना निघून जाईल पण दुभांगलेल्या मनांचे काय? ते कसे सांधायचे असा प्रश्न निर्माण होण्याची भिती असतानाच डोंगर कपारीतील लोहरवाडीच्या ग्रामस्थांनी चोखळलेली वेगळी वाट अन्य गावांसाठी दिशादर्शक ठरली आहे. 

तेथील प्राथमिक शाळेत मुक्कामी थांबलेल्या मुंबईकरांचा क्‍वॉरंटाईन कालावधी संपल्याने आज तेथील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून घरी पाठवले. सरपंच जयवंतराव देसाई, सदस्य उमेश लोहार, काशीनाथ लोहार, शंकर सवादेकर, दिलीप लोहार, सदाशिव लोहार, अशोक सवादेकर, शालन सवादेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

उमेश लोहार म्हणाले, "गावागावात आलेले मुंबईकर हे गावचेच एक घटक आहेत. खबरदारी म्हणूनच त्यांना काही दिवस क्‍वॉरंटाईन केले जात आहे आणि तेही स्वतःसह, कुटुंबीय व गावकऱ्यांच्या काळजीपोटी आवश्‍यक दक्षता घेत यंत्रणेला सहकार्य करत आहेत. आज काहींचा क्‍वॉरंटाईन कालावधी संपल्यानंतर ते घरी परतण्यापुर्वी श्रीफळ देवून आम्ही त्यांचे ग्रामस्थांतर्फे स्वागत करत प्रेम व आपुलकीचा धागा अधिक घट्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

SCROLL FOR NEXT