jawali 
सातारा

हा रस्ता आहे का मोट्रोक्रॉस ट्रॅक

सकाळ वृत्तसेवा

केळघर (जि. सातारा) : केळघर-मेढा रस्ता वाहतुकीस असुरक्षित होत असून, रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढणार आहे. 

सध्या विटा-महाबळेश्वर या रस्त्याच्या चारपदरी करण्याचे काम गतीने सुरू आहे. मात्र, हे काम सलगपणे न करता थोडे-थोडे केले जात आहे. केळघर ते मेढा दरम्यान केळघरच्या प्रवेशद्वारावर रस्ता एक बाजूने उकरलेला आहे. दुसरी बाजू डांबरीकरण केलेली आहे. मात्र, एक बाजूला पूर्णपणे रस्ता तसाच ठेवला आहे. त्यातच दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने या रस्त्यावर दुचाकी चालवणे जिकिरीचे झाले आहे. या दोन दिवसांत केळघर गावच्या प्रवेशद्वारजवळ चार ते पाच दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. रस्ता निसरडा व चिखलमय झाल्याने गाड्या घसरू लागल्या आहेत. 

वास्तविक ठेकेदाराने पावसाआधी रस्त्याचे काम निदान एका बाजूने तरी पूर्ण करणे आवश्‍यक होते. जवळजवळ अडीच महिने लॉकडाउन सुरू असल्याने केळघर हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदार कूर्मगतीने काम करत असल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. इतर ठिकाणी गतीने काम सुरू असतानादेखील केळघर ते आंबेघर हद्दीपर्यंत काम अपुरे असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यावर ठेकेदाराचे डोळे उघडतील का, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT