Satara mishion vatsalya  esakal
सातारा

Satara : मिशन वात्सल्य’चा महिलांनी घेतला लाभ

कोरेगाव पंचायत समिती, आयडीबीआयतर्फे कौशल्य विकास कार्यक्रम

सकाळ डिजिटल टीम

कोरेगाव : मिशन वात्सल्य अंतर्गत ‘आयडीबीआय’च्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने येथील पंचायत समितीच्या बालविकास विभागाच्या वतीने कोरेगाव तालुक्यातील कोविड काळातील विधवा महिलांसाठी आयोजित केलेल्या दहा दिवसांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा २७ गरजू महिलांनी लाभ घेतला.

प्रशिक्षणाची सांगता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरणाने झाली. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, ‘आयडीबीआय’चे संचालक प्रशांत पाटील, कोरेगावचे बालविकास प्रकल्प अधिकारी सुजित इंगवले उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीमती देसाई यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची समाजातील विधवा महिलांना आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. श्रीमती बोराटे यांनीदेखील कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करत खऱ्या अर्थाने या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा हा प्रयत्न असल्याबाबत मत व्यक्त केले. प्रशांत पाटील यांनी इतर तालुक्यांनी देखील याबाबत पुढाकार घेऊन प्रशिक्षणार्थी उपलब्ध करून दिल्यास त्यांना प्रशिक्षण देण्याची ग्वाही दिली.

श्री. इंगवले यांनी आयडीबीआयच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे, तसेच प्रशिक्षणार्थींचे आभार मानले. ‘मिशन वात्सल्य’अंतर्गत कोरेगाव तालुक्यात कोविडमधील विधवा महिलांसाठी हा कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशा प्रकारचे उपयुक्त उपक्रम इथून पुढेही राबवले जातील, अशी ग्वाही सर्व अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. सर्व प्रशिक्षणार्थी महिलांनीही या प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT