यात्रेसाठी निर्बंध चालतील; पण बंदी नको - ग्रामस्थांची भुमिका Sakal
सातारा

सातारा : यात्रेसाठी निर्बंध चालतील; पण बंदी नको - ग्रामस्थांची भुमिका

श्री सेवागिरी महाराजांच्या ७४ व्या पुण्यस्मरणानिमित्त जानेवारी २०२२ मध्ये पार पडणाऱ्या यात्रा प्रदर्शनास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ऋषिकेश पवार

विसापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ७४ व्या पुण्यस्मरणानिमित्त जानेवारी २०२२ मध्ये पार पडणाऱ्या यात्रा प्रदर्शनास प्रशासनाने परवानगी द्यावी. यंदाच्या यात्रेवर कोरोनाचे निर्बंध चालतील. मात्र, बंदी नको, अशी आक्रमक भूमिका पुसेगावमधील ग्रामस्थांनी प्रदर्शनाच्या नियोजनाबाबत श्री सेवागिरी मंदिरात आयोजित ग्रामसभेत मांडली.

या ग्रामसभेस मठाधिपती सुंदरगिरी महाराज, श्री सेवगिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सरपंच विजय मसणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाने भक्त-भाविकांच्या भावना लक्षात घेऊन यात्रेच्या मुख्य दिवशी श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी व नोटांच्या माळांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यासाठी परवानगी दिलीच पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ राम जाधव यांनी केली. सार्वजनिक समारंभ, राजकीय कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धांना प्रशासन परवानगी देत आहे, त्याच प्रकारे यात्रेच्या कालावधीत आयोजित कार्यक्रमांना प्रशासनाने परवानगी द्यायला हरकत नाही, अशी भूमिका विश्वस्त रणधीर जाधव यांनी मांडली. यावेळी यात्रा झालीच पाहिजे, या मागणीसाठी सभेत ग्रामस्थ आक्रमक दिसून आले.

यावेळी विश्वस्त डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘‘प्रशासन आणि ग्रामस्थांच्या भावनांच्या समन्‍वयातून यात्रा भरावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहेत. गतवर्षीप्रमाणे प्रशासनाला आमचे सहकार्य असणारच आहे. पण, यात्रा भरलीच पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका असणार आहे.’’ विशाल माने यांनी प्रास्ताविक केले. मोहनराव जाधव यांनी स्वागत केले तर प्रताप जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT