सातारा : जिल्हा परिषदेच्या वतीने स्मार्ट शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक शाळा व एक प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट बनवण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत आहे. इंग्रजी माध्यमातील अनेक विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येत आहेत. शाळांमध्ये जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यावर प्रशासनाचा भर आहे. जिल्ह्यात आता स्मार्ट शाळा हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक शाळा स्मार्ट केली जाणार आहे. आदर्श शाळा अंतर्गत सातारा जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदर्श शाळानिर्मिती उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा रोलमॉडेल बनण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. त्याद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा गतीने पुरवण्यावर भर दिला जात आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानांतर्गत स्मार्ट भौतिक पायाभूत सुविधा, स्मार्ट मनुष्यबळ, स्मार्ट संदर्भसेवा, स्मार्ट माहिती व तंत्रज्ञानाचा वापर व पर्यावरण संतुलित स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यावर आधारित स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र व एका शाळेची निवड करून या अभियानांतर्गत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा उभ्या करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यात स्मार्ट शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान सुरू करण्यात येत आहे. निधीच्या उपलब्धततेनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
-विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.