School sakal media
सातारा

राज्य प्रदर्शनासाठी २१ शाळांची निवड

इन्स्पायर ॲवॉर्ड; ६३० शाळांतील २ हजार १७० विद्यार्थ्यांकडून नामनिर्देशन

संजय जगताप

मायणी : इन्स्पायर ॲवॉर्ड मानकासाठी जिल्ह्यातील ६३० प्राथमिक व माध्यमिक शाळातील दोन हजार १७० विद्यार्थ्यांनी नामांकन करून नानाविध उपकरणे सादर केली. तज्ज्ञ समितीने ऑनलाइन पद्धतीने परीक्षण करून उत्कृष्ट २१ उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड केली आहे.

केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत इन्स्पायर ॲर्वार्ड मानक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अधिकाधिक पाच विद्यार्थ्यांना त्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी असते. नवनवीन विचार, संकल्पना, तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी उपकरणे बनविणे अपेक्षित असते. त्यासाठी नामांकनातून निवड झालेल्या दोन हजार १७० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये डिजिटली जमा करण्यात आले होते. त्या सर्वांनी मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने उपकरणे तयार करून ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. त्याचे परीक्षण आठ जणांच्या तज्ज्ञ समितीकडून करण्यात आले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, ‘प्राथमिक’चे शिक्षणाधिकारी चोपडे, जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे, विज्ञान पर्यवेक्षिका, शिक्षण विस्तार अधिकारी मंगल मोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शाळा प्रमुखांचे अभिनंदन केले.

तालुकानिहाय यशस्वी विद्यार्थी व कंसात शाळा पुढीलप्रमाणे : जावळी- ओंकार गोळे (एस. व्ही. डी. एम. व्ही. पंचक्रोशी, गांजे), यश सुरवसे (महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय, कापसेवाडी). कऱ्हाड- अनुराधा कोरडे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुळसण), अस्मिता मोरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोडोली), खंडाळा- वैष्णवी कानडे (क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, नायगाव), श्रावणी ढेंबरे (एम. इ. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, शिरवळ), शिवराज पवार (वसंतराव पवार पाटील विद्यालय, शिवाजीनगर). खटाव- ओंकार जगताप (चंद्रसेन विद्यामंदिर, धोंडेवाडी), कोरेगाव- शाहीद जमखिंडवाले (टी. बी. एम. इ. सी. ट्रस्ट विद्यालय, आझादपूर). महाबळेश्वर- प्रतिमा मर्ढेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा, भिलार), सानवी मोरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जावली). पाटण- वेदांतिका काटे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पान ४ वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT