ZP-Satara Sakal
सातारा

Satara News : जिल्ह्यात ७२३ गावांत सांडपाणी-घनकचरा प्रकल्प; १,४९९ गावांत कामे सुरू

ग्रामीण भागांत आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक असणारा सांडपाणी व घनकचरा प्रकल्प वेगाने सुरू आहे.

प्रशांत घाडगे

ग्रामीण भागांत आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक असणारा सांडपाणी व घनकचरा प्रकल्प वेगाने सुरू आहे.

सातारा - ग्रामीण भागांत आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक असणारा सांडपाणी व घनकचरा प्रकल्प वेगाने सुरू आहे. सध्या जिल्ह्यात ७२३ गावांमध्ये दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत, तर एक हजार ४९९ गावांत प्रकल्पाचे कामे सुरू आहे. या प्रकल्पांमुळे गावागावांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखून सार्वजनिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे.

स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत ग्रामस्तरावरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारणीस वेग घेत आहे. ग्रामीण भागात स्वच्छता शाश्‍वत स्वरूपात टिकविण्यासाठी घनकचरा व सांडपाणी, गोबरधन, मैला गाळ, प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनासाठी कामे सुरू आहेत. या योजनेसाठी ग्रामपंचायतीची निवड करताना गावाची लोकसंख्या, वैयक्तिक स्वच्छतागृहांची व्याप्तीची संख्या लक्षात घेतली जाते.

पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावांत सांडपाण्यासाठी प्रतिव्यक्ती २८० रुपये, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रती व्यक्ती ६० रुपये व पाच हजार लोकसंख्येपेक्षा अधिक गावात प्रतिव्यक्ती ६०० रुपये, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी ४५ रुपये अनुदान देण्यात येते.

दरम्यान, जिल्ह्यात पाच हजार लोकसंख्येवरील एकूण ७२ ग्रामपंचायतींपैकी ५९ गावांचे प्रकल्प आराखडे झाले आहेत.

१३ गावांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यापैकी ४९ गावांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय मंजुरीसाठी ४५ ग्रामपंचायती प्रस्तावित आहेत. ३५ गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात पाच हजार लोकसंख्येच्या आतील एक हजार ६६० ग्रामपंचायती आहेत. एक हजार ५३४ गावांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी व एक हजार ४९९ गावांमधील कामे सुरू आहेत.

जिल्ह्यात ७२३ गावांमध्ये प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. उर्वरित कामे लवकरात-लवकर पूर्ण केली जाणार असल्याची माहिती स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी दिली.

ग्रामपंचायतीच्या निधीमुळे काही कामे रखडली

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण जिल्हास्तरावर ७० टक्के निधी, तर ग्रामपंचायत स्तरावर १५ व्या वित्त आयोगातून स्वच्छतेच्या कामाला ३० टक्के निधी देणे आवश्‍यक आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींत स्वच्छतेच्या कामांना ३० टक्के निधीची तरतूद न केल्याने कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील ७२३ गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. या वर्षी घनकचरा व सांडपाण्याचे प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. प्लॅस्टिक निर्मूलन केंद्राचा प्रकल्पही वेगाने पूर्ण करणार आहे.

- ज्ञानेश्‍वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा.

प्रत्येक तालुक्यामध्ये प्लॅस्टिक निर्मूलन केंद्र

प्लॅस्टिकचे संकलन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्लॅस्टिक व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ११ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नऊ ठिकाणी टेंडर प्रक्रिया झाली आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणीय हानी टळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Latest Maharashtra News Updates : घाटकोपरमधील शाळेवरुन पालकांचा उद्रेक

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

SCROLL FOR NEXT