सातारा

डाॅक्टरकडून लाखाेंची खंडणी उकळणा-या पुण्यासह साता-यातील महिलेस अटक

उमेश बांबरे

सातारा : व्हॉटस्‌ऍपवरील व्हिडिओ संभाषणाचे रेकॉर्डिंग करून ते समाजमाध्यमातून व्हायरल करून बदनामी करण्याची तसेच पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देऊन एका व्यक्तीकडून 12 लाखांची खंडणी उकळणाऱ्या तिघींना आज शाहूपुरी पोलिसांनी पडकले. प्राची ऊर्फ श्रध्दा अनिल गायकवाड (वय 35, सोमवार पेठ, सातारा), पूनम संजय पाटील (वय 35, मूळ गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे, सध्या सोमवार पेठ,सातारा) असे दोघींचे नाव असून, एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. त्यांच्याकडून 11 लाख 95 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. त्यांना न्यायालयात दाखल केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यापैकी अल्पवयीन मुलीस नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तिघींनी एका व्यक्तीसोबत झालेल्या व्हॉट्‌सऍप व्हिडिओ संभाषणाचे रेकॉर्डिंग करून ते समाजमाध्यमातून व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली होती. तसेच पोलिसांत तक्रार देण्याची भीती दाखवून 60 लाखांची खंडणी मागितली होती. बदनामीच्या भीतीने संबंधित व्यक्तीने यापैकी पाच सप्टेंबरला 12 लाख रुपये रोख स्वरूपात या महिलांना दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

साताऱ्यातील मूकमोर्चा स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती निर्णय

हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी यासंदर्भात तातडीने कारवाईची सूचना शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांना दिली होती. त्यानुसार श्री. वायकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे, हवालदार आतिश घाडगे, श्रीनिवास देशमुख, सतीश बाबर, सुनील भोसले, अमित माने, ओंकार यादव, मनोहर वाघमळे, श्री. गायकवाड, वैशाली गुरव, पंकजा जाधव यांनी दोन पंचाच्या उपस्थितीत कारवाई करण्याची तयारी पूर्ण केली.

रेशन दुकानदारांचे प्रशासनाकडे अडकले तब्बल दहा कोट रुपये!

त्यानंतर फिर्यादीला या महिलेस फोन करून तुम्ही मागितलेल्या खंडणीची उर्वरित रक्कम देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार या महिलांनी काही वेळातच आम्ही पैसे घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार फिर्यादीस एक लाख रुपयांच्या नोटा महिलांना देण्यासाठी पाठविले. त्यावेळी तीन महिला खंडणीची रक्कम घेण्यासाठी आल्या. त्यांनी फिर्यादीकडून पैसे स्वीकारल्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिघींना पकडले. यामध्ये प्राची ऊर्फ श्रध्दा अनिल गायकवाड (वय 35, सोमवार पेठ, सातारा), पूनम संजय पाटील (वय 35, मूळ गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे, सध्या सोमवार पेठ, सातारा) तसेच एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपयांच्या नोटाही ताब्यात घेण्यात आल्या. यापैकी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली.

शाहूपुरी ग्रामविकासाच्या सदस्यांनी मासिक भत्ता रकमेतून ऑक्सिजन  मशीन 

या महिलांनी सुरवातीला घेतलेल्या 12 लाख रुपयांतून 11 लाख 95 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले होते. ते पोलिसांनी जप्त केले. तिसऱ्या अल्पवयीन मुलीस नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महिलांना न्यायालयात दाखल केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT