सातारा

सातारा : चुकीला माफी नाही; गृहराज्यमंत्र्यांची स्पष्टाेक्ती

सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्य पोलिस दलात लौकिक मिळविलेले अधिकारी खूप माेठ्या संख्येने आहेत. एखादा अधिकार चुकला म्हणून सर्वांना दोषी धरणे उचित ठरणार नाही. याबराेबरच पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. आगामी काळातही मुंबई पोलिस नावलौकिकाला साजेसे काम करत राहतील. ज्यांची चुक झाली असेल त्यांची चौकशी हाेईल. चाैकशीअंती सिध्द झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी मंत्री देसाई आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मंत्री देसाईंनी केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून सातत्याने होत आहे. वारंवार सरकारवर हाेणा-या आराेपांना आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर उत्तर देत आलाे आहाेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सरकारची भक्कमपणे वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीनिवास पाटलांच्या प्रश्नांवर गडकरी म्हणाले, आजच्या आज मला पत्र द्या

मंत्री देसाई म्हणाले पहिल्या दिवसापासून या संपूर्ण प्रकरणात स्फोटके असलेल्या गाडीचा तपास एटीएसचे अधिकारी करत होते. या प्रकरणाच्या अगदी जवळपर्यंत एटीएस पोहोचली होती. महाराष्ट्र पोलिसांची ही चांगली यंत्रणा असताना आणि महाराष्ट्र पोलिसांचा जगभर नावलौकिक असताना त्यांच्यावर गैरविश्‍वास दाखवून बाहेरच्या यंत्रणेमार्फत तपास करा, असे म्हणायचे हा महाराष्ट्रात राहून येथील पोलिसांवर गैरविश्‍वास दाखविल्यासारखे हाेत आहे.

एनआयकडून तपास सुरू असल्याने एटीएसकडून केवळ दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर टीकाच करत असतात. एखाद्या बाबींचा तपास करताना संबंधित यंत्रणेच्या अधिकृत प्रतिनिधींकडून तपासात काय प्रगती झाली आहे हे बाहेर येत नाही. तोपर्यंत बाहेर केवळ वावड्या उठत असतात त्यावर बोलणे योग्य नाही.

सध्या पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचे चित्र आहे. नावलौकिक असलेल्या मंबई पोलिसांची नाचक्की झाली असून ती भरून काढण्यासाठी काय केले जाईल, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे पोलिस दल मोठे आहे. अनेक अधिकारी उत्तम कामगिरी करीत आहेत. एखादा अधिकारी चुकला म्हणून सगळ्यांना दोषी धरणे योग्य नाही. तसेच पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असे म्हणणेही योग्य नाही. यापूढेही मुंबई पोलिस लौकिकास साजेल असे करत राहतील असा विश्वास व्यक्त करीत ज्यांची चुक झाली असेल त्यांची चौकशी करून ती सिध्द झाली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने व्यवस्थापनाने आठ दिवस शाळा बंद ठेवण्याचा घेतला निर्णय़ 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी संसदेत भाजपकडून होत आहे. यावर श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम विरोधकांना पहावत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून लोकमताचा पाठींबा या सरकाला आहे. केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशी मागणी भाजपकडून होत आहे. यात कोणतेही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सरकारची भक्कमपणे वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पद मिळाले की लेटरपॅड, व्हिजिटिंग कार्ड छापण्यापुरते मर्यादित राहू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT