Satara Police Kanher Canal  esakal
सातारा

Satara Crime : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पवारांचा काढला काटा; गळा आवळून, हात-पाय बांधून मृतदेह फेकला कालव्‍यात

पैशांवरून शरद पवार आणि दीपाली बिचुकले यांच्‍यात वारंवार होत होती चर्चा

सकाळ डिजिटल टीम

प्रेम संबंधांत अडसर ठरत असल्‍याचे, तसेच उसने दिलेले पैसे वारंवार मागत असल्‍याने शरद पवार यांच्‍यावर दीपाली ऊर्फ मनीषा बिचुकले, दादा बिचुकले चिडून होते.

सातारा : कापडाने गळा आवळल्‍यानंतर पाय बांधून मृतदेह पाटखळ माथा (ता. सातारा) येथील कण्‍हेर कालव्‍यात फेकत खेड (सातारा) येथील शरद मधुकर पवार (Sharad Pawar) यांचा खून केल्‍याप्रकरणी सातारा तालुका पोलिस (Satara Police) ठाण्‍यात बावधन (ता. वाई), नेले (ता. सातारा) येथील तिघांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

विजय सुरेश भोसले (रा. नेले, ता. सातारा), दीपाली ऊर्फ मनीषा दादा बिचुकले, दादा जयराम बिचुकले (रा. बावधन, ता. वाई) अशी अटकेत असणाऱ्या संशयितांची नावे आहेत. खेड येथे शरद मधुकर पवार (वय ३७) हे राहण्‍यास होते. ते सातारा परिसरातील एका मॉलमध्‍ये नोकरीत होते. याचठिकाणी काम करणाऱ्या बावधन (ता. वाई) येथील दीपाली ऊर्फ मनीषा दादा बिचुकले यांच्‍याशी ओळख होती.

ओळखीच्‍या दीपाली यांना शरद पवार यांनी काही रक्कम उसनी दिली होती. या पैशांवरून, तसेच इतर कारणावरून शरद पवार आणि दीपाली ऊर्फ मनीषा बिचुकले यांच्‍यात वारंवार चर्चा, भेटी होत असते. याचदरम्‍यान दीपाली यांच्‍या प्रेमसंबंधांची माहिती शरद पवार यांना मिळाली. प्रेमसंबंधात अडथळा येत असल्‍याच्‍या कारणावरून दीपाली व विजय भोसले शरद पवार यांच्‍यावर चिडून होते.

दरम्‍यान, सातारा तालुका पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील पाटखळ माथा येथील कण्‍हेर कालव्‍यात ता. ९ रोजी एका पुरुषाचा मृतदेह ग्रामस्‍थांना आढळला. याची माहिती मिळाल्‍यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्‍याचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले. त्‍यांनी कालव्‍यातून मृतदेह बाहेर काढत पाहणी केली. यावेळी मृताच्‍या गळ्यास ओढणी आवळल्‍याचे, तसेच त्‍याचे पाय कापडाने बांधल्‍याचे दिसून आले.

घातपाताचा संशय बळावल्‍याने सातारा तालुका पोलिसांनी ता. ९ रोजी अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करत तपास सुरू केला. बेपत्ता व्‍यक्‍तींच्‍या तपासात हा मृतदेह बेपत्ता असणाऱ्या खेड येथील शरद पवार यांचा असल्‍याचे समोर आले. यानुसार पोलिसांनी त्‍या अनुषंगाने चौकशी सुरू केली.

चौकशीत मिळालेल्‍या माहितीची पडताळणी करत सातारा तालुका पोलिसांनी बावधन (ता. वाई) येथून दीपाली ऊर्फ मनीषा बिचुकले आणि दादा जयराम बिचुकले, नेले येथील विजय भोसलेला ताब्‍यात घेतले. ताब्‍यातील तिघांनी चौकशीत शरद पवार यांचा खून केल्‍याचे कबूल केले. यानुसार त्‍या तिघांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. याची फिर्याद उपनिरीक्षक ज्ञानेश्‍‍वर दळवी यांनी नोंदवली असून, तपास पोलिस निरीक्षक विश्‍‍वजित घोडके हे करीत आहेत.

बेपत्ता असल्‍याची होती तक्रार

खेड येथे राहणारे शरद पवार हे घरात कोणास काहीही न सांगता निघून गेले होते. शोधूनही ते न सापडल्‍याने याची तक्रार ता. ८ रोजी त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली होती. कालव्‍यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्‍यानंतर सातारा तालुका पोलिसांनी बेपत्ता व्‍यक्‍तींची माहिती संकलित केली. या माहितीची पडताळणी करत मृताची ओळख पटविण्‍यात पोलिसांना यश आले.

शनिवारी केला खून

प्रेम संबंधांत अडसर ठरत असल्‍याचे, तसेच उसने दिलेले पैसे वारंवार मागत असल्‍याने शरद पवार यांच्‍यावर दीपाली ऊर्फ मनीषा बिचुकले, दादा बिचुकले चिडून होते. यातूनच पवार यांचा काटा काढण्‍याचे ठरवण्‍यात आले. वाढे येथे शनिवारी (ता. ५) रात्री त्‍या तिघांनी पवार यांचा गळा आवळून खून करत पाय बांधून मृतदेह पाटखळ माथा येथे कालव्‍यात फेकून दिला. मृताच्‍या गळ्यास ओढणीचे कापड, त्‍याला गाठ असल्‍याचे, तसेच पाय बांधल्‍याचे आढळल्‍याने पोलिसांनी तपासाला गती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT