Sharad Pawar
Sharad Pawar esakal
सातारा

ठरलं! शिवेंद्रसिंहराजेंना घेऊनच NCP चे पॅनेल

उमेश बांबरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी कोणतीही चर्चा झाली नाही.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) सर्वसमावेशक पॅनेल करताना महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांनाही प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा झाली. शिवेंद्रसिंहराजेंना (MLA Shivendrasinharaje Bhosale) सामावून घेऊनच राष्ट्रवादीचे पॅनेल उभे राहणार असून, इच्छुक असलेल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Speaker Ramraje Nimbalkar) यांनी केली; पण पॅनेलमधील नावे अंतिम करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेच घेणार आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये दोन्ही पवारांसोबत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक होऊन त्यामध्ये पॅनेलमधील उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच पुण्यात रामराजेंच्या निवासस्थानी झाली. या वेळी सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांना मुंबईत अचानक दोन बैठका लागल्याने ते बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोणकोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहेत, याचा आढावा घेण्यात आला. सोसायटी मतदारसंघ, राखीव मतदारसंघासोबतच संस्था मतदारसंघातील नावांवरही चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत पॅनेल करणार असून, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, भाजप असे सर्वसमावेशक पॅनेल करण्यावर चर्चा झाली. या प्राथमिक बैठकीत सोसायटीतून कोण कोण इच्छुक आहेत, याची माहिती रामराजेंनी घेतली. संस्था मतदारसंघातून कोण कोण इच्छुक आहेत, तसेच राखीव जागांबाबतही चर्चा झाली. तसेच शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. काही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या जास्त आहे. तेथील निर्णय उपमुख्यमंत्री पवार व खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत.

ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा शरद पवार व उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांशी चर्चा करून शरद पवार हे राष्ट्रवादीतील सर्वसमावेशक पॅनेलमधील उमेदवारांची नावे अंतिम करणार आहेत. शक्यतो निवडणूक बिनविरोध कशी होईल, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भर असल्याचे बैठकीतील सुरातून स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील इच्छुकांना सामावून घेताना राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. पाटणमध्ये गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कसे ॲडजेस्ट करणार, काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकरांना समावून घ्यायचे का, तसेच सहकारमंत्री पाटील यांनी बॅंका, पतसंस्था मतदारसंघाची जागा देण्याची केलेली मागणी याविषयीही चर्चा झाली. त्यामुळे खासदार पवार व उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबतच्या बैठकीत जास्तीतजास्त जागा बिनविरोध कशा होतील, यावर भर दिला जाणार आहे. ज्या जागांवर वाद असून, एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांना कसे थांबविले जाणार याची आता उत्सुकता आहे.

बैठकीत उदयनराजे, गोरेंचा उल्लेखही नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पुण्यात झालेल्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्या नावाचा कोणी नामोल्लेखही केला नाही. खासदार उदयनराजे गृहनिर्माण आणि दुग्ध उत्पादक, प्रक्रिया संस्था मतदारसंघातून, तर आमदार जयकुमार गोरे हे माण सोसायटी मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये स्थान मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

Jayanta Patil: सांगलीच्या अपक्ष उमेदवाराची मी शिफारस केलेली, मात्र... जयंत पाटलांचा मोठा खुलासा

IPL 2024 : पराभव विसरा, पुढच्या तयारीला लागा... कर्णधारने सहकाऱ्यांना दिला मोठा सल्ला

Malaria Vaccine : मलेरियाच्या विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन लस, जेएनयू विद्यापीठाचे संशोधन

Latest Marathi News Update: उजनी धरणात पडलेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले

SCROLL FOR NEXT