Sharad Pawar
Sharad Pawar esakal
सातारा

उदयनराजेंचा निर्णय शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात

उमेश बांबरे

खासदार उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरचा आहे.

सातारा : कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) विरुद्ध उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysingh Patil Undalkar) ही लढत राष्ट्रवादीसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे येथे बारकाईने लक्ष ठेवा आणि काम करा, अशी सूचना शरद पवार (Sharad Pawar) यांनी सभापती रामराजे निंबाळकर (Speaker Ramraje Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना केली. खासदार उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्याचा निर्णय तुमच्या स्थानिक पातळीवरचा आहे. त्यावर तुम्हीच एकत्र बसून निर्णय घ्या आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर ती जबाबदारी सोपवा. त्यांचाही निर्णय यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले. बारामतीत (Baramati) झालेल्या या बैठकीत श्री. पवार यांनी जिल्हा बॅंकेत सावध भूमिका घेण्याची सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली.

खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बारामती येथे घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार मकरंद पाटील उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार आहेत आणि कोठे काय होऊ शकते, याची माहिती श्री. पवार यांनी घेतली. सभापती रामराजेंनी मतदारसंघनिहाय आढावा सांगितला. मात्र, सुरुवातीला उदयनराजे भोसले यांचा विषय चर्चेला आला. ते गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था मतदारसंघातून रिंगणात आहेत. तेथे काय परिस्थिती आहे, याचीही माहिती घेतली. मात्र, राष्ट्रवादीप्रणीत ‘सर्वसमावेशक अथवा सर्वपक्षीय पॅनेल’मध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे की नाही, असे शरद पवारांना विचारले असता त्यांनी ‘हा निर्णय तुमच्या स्थानिक पातळीवरचा आहे. त्यावर तुम्हीच एकत्र बसून निर्णय घ्या आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर ती जबाबदारी सोपवा. त्यांचाही निर्णय यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे,’ असे श्री. पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील आणि माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील यांच्यातील कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात लढत होणार आहे. याची माहितीही शरद पवार यांनी घेतली. येथे मतांची विभागणी कशी होणार, कोण कोणाला मदत करणार, कोणा कोणाचा पाठिंबा मिळू शकतो, याचीही माहिती श्री. पवार यांनी घेतली. ही लढत आपल्यासाठी प्रतिष्ठेची असून, तेथे बारकाईने लक्ष ठेवा आणि काम करा, अशी सूचना शरद पवार यांनी सभापती रामराजे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिली. राष्ट्रवादीच्या सर्वपक्षीय पॅनेलच्या विरोधात कोण-कोण प्रभावीपणे लढू शकते, कोण निर्णायक ठरू शकते, सर्वात त्रासदायक कोण असेल, याबाबतचीही माहिती सभापती रामराजेंनी श्री. पवार यांना दिली. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजपप्रणित सर्वसमावेशक पॅनेलचाही आढावा त्यांनी घेतला. माण सोसायटी मतदारसंघात कशा पद्धतीने लढत होईल, यावर रामराजेंनी सविस्तर सांगितले. जयकुमार गोरे यांच्या विरोधात त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती दिली. दरम्यान, याच बैठकीत पवारांनी ‘खटाव’चाही धावता आढावा घेतला.

प्रभाकर घार्गे लढणार

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून, आज महिला राखीवमधून इंदिरा प्रभाकर घार्गे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे खटाव सोसायटी मतदारसंघातून प्रभाकर घार्गे व त्यांची पत्नी इंदिरा घार्गे यांचा अर्ज राहिला आहे. त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता खटाव सोसायटीतून प्रभाकर घार्गे सर्व विरोध मोडीत काढून दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार नंदकुमार मोरे यांच्या विरोधात लढणार हे निश्चित झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT