Sharad Pawar esakal
सातारा

Balasaheb Patil : शरद पवारांची निवृत्ती धक्कादायक, त्यांनी निवृत्तीचा निर्णय..; काय म्हणाले आमदार पाटील?

पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला.

हेमंत पवार

अध्यक्षपदाच्या निर्णयासंदर्भात विचार करण्यासाठी पवारांनी सुचवलेल्या समितीची बैठक आज (शुक्रवारी) मुंबईत होत आहे.

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी मुंबईत भेट घेतली. निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती जिल्ह्याच्या वतीने केली असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

दरम्यान, आज (शुक्रवारी) पक्षाध्यक्षपदाबाबतच्या निर्णयासंदर्भात नेमलेल्या समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आमदार पाटील हे आज मुंबईला (Mumbai) रवाना झाले. श्री. पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर पक्षात घडामोडी सुरू झाल्यानंतर मतदारसंघात असलेले आमदार पाटील त्याच दिवशी दुपारी तातडीने मुंबईला रवाना झाले.

बुधवारी त्यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पवारांची निवृत्ती ही धक्कादायक असून, त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पक्षासाठी कार्यरत राहावे, अशी विनंती आमदार पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने केली. दरम्यान, मतदारसंघातील कामानिमित्त रात्री आमदार पाटील हे आज परत आले.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निर्णयासंदर्भात विचार करण्यासाठी पवारांनी सुचवलेल्या समितीची बैठक आज (शुक्रवारी) मुंबईत होत आहे. आज आमदार पाटील यांना मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून आज होत असलेल्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत निरोप देण्यात आला. त्यामुळे आमदार पाटील हे काल दुपारी पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. आज ते मुंबई येथील पक्षाच्या समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT