Shashikant Shinde vs Shivendraraje Bhosale
Shashikant Shinde vs Shivendraraje Bhosale Esakal
सातारा

नावाने राजे नसलो तरी जनतेच्या मनातील नक्कीच राजे आहोत - शशिकांत शिंदे

महेश बारटक्के

अलीकडेच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) विरुद्ध भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहेत. जावळी तालुक्यातील मोरखिंड येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी शशिकांत शिंदे यांनी शिवेद्रराजेंवर सडकून टीका केली आहे. ''नावाने राजे नसलो तरी जनतेच्या मनातील आम्ही नक्कीच राजे आहोत'', असा खोचक टोला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लगावला. (Shashikant Shinde Criticize Shivendraraje Bhosale)

सातारा जिल्ह्यातील राजकारण अलीकडे चांगलेच तापले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सतत आरोपाच्या प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच अलीकडे झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीतील (DCC Bank Election) आपल्या पराभवासाठी शिवेंद्रराजे भोसले जबाबदार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले होतं. त्यानंतर सातत्याने हे दोघेही एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान जावळी तालुक्यातील मोरखिंड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलताना शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली. ''नावाने राजे नसलो तरी जनतेच्या मनातील आम्ही नक्कीच राजे आहोत'', असा खोचक टोलाही शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लगावला.

या कार्यक्रमात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून मोरघर येथे सभा मंडप , पंचायत समिती उपसभापती सौरभ शिंदे यांच्या फंडातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात काँक्रीटीकरण ,जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या फंडातून मोरखर स्मशानभूमी रस्त्यावरील पूल, ग्रामपंचायत नवीन इमारत, तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्या फंडातून मोरखिंड गटार व काँक्रीट करण आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, अमित कदम, माथाडी कामगार नेते सुरेश तात्या गायकवाड, अजित भोसले, तुषार सावंत, मोरघर सरपंच रंजना मोरे, उपसरपंच आशालता गायकवाड, प्रतापगड चे संचालक भानुदास गायकवाड, सुरेश गायकवाड, महागाव सोसायटी चेअरमन रमेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, निलेश गायकवाड, दत्त गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह मोरखिंड ग्रामस्थ व मोरघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT