Shikhar Shingnapur esakal
सातारा

शिंगणापूरात शिवपार्वतीचा हळदी समारंभ उत्साहात

हा सोहळा पाहण्यासाठी सर्व परिसरातून भाविक शिंगणापूरमध्ये गर्दी करतात. या वेळी ढोल, ताशा, तुतारी, पिपाण्या, हलगीच्या आवाजाने व हर हर महादेव गर्जनेने शिंगणापूर नगरी दुमदुमून जाते.

धनंजय कावडे

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शिवपार्वतीचा हळदी समारंभ शनिवारी चैत्र शुद्ध पंचमीला साध्या पद्धतीने पोलिस बंदोबस्तात झाला. या वेळी बडवे, (कावडे) जंगम, भंडारगृहमठ संस्थान, कोल्हापूर संस्थान, सातारकर संस्थान, वहिवाटदार ओंकार देशपांडे, चार चौथाई, जिराईतखाने, वाघमोडे, घडशी, कोळी, साळी, दांगट, माळी, शेटे, चौधरी, नाभीक, पाटील, नायकिन असे मानकरी मंडळीनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेऊन शिवपार्वतीचा हळदी समारंभ साध्या पद्धतीने साजरा केला.

दर वर्षी शिखर शिंगणापूर शंभूमहादेव माता पार्वती यांच्या चैत्र यात्रेचा सोहळा पाडवा ते पौर्णिमा असा दहा दिवसांचा असतो. यातील पंचमीला हळदी, समारंभ अष्टमीला लग्न (ध्वज पागोटे बाधण्याच सोहळा) रात्री 12 वाजता विवाह लागतो. एकादशीला द्वादशीला (बारसीला) अवघड मुंगी घाटातून सासवड पंचक्रोशीतील व इतर कावड चढण्याचा सोहळा होतो. रात्री बाराला महादेवास संत भुतोजी तेली बुवा सासवड याच्यांकडून महादेवास जलाअभिषेक करून यात्रेची सांगत होते. हा सोहळा पाहण्यासाठी सर्व परिसरातून भाविक शिंगणापूरमध्ये गर्दी करतात. या वेळी ढोल, ताशा, तुतारी, पिपाण्या, हलगीच्या आवाजाने व हर हर महादेव गर्जनेने शिंगणापूर नगरी दुमदुमून जाते; परंतु गेल्या वर्षापासून कोरोना संसर्ग रोगामुळे प्रशासनाने यात्रेवर बंदी घातल्याने मंदिर परिसर व नगरी शिंगणापुरात शुकशुकाट पसरला आहे.

Video पाहा : विनाकारण फिरताय मग कोविड टेस्ट करा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धनंजय मुंडे परळीतच बरे! अजितदादांनी दिलेल्या नवीन जबाबदारीला राष्ट्रवादीच्याच आमदाराचा विरोध

Pakistan Arms Smuggling India : पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हाय-क्वालिटी बंदुका भारतात; सिकंदर शेख प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Navi Mumbai: नवी मुंबईत उभारणार नवं सायन्सपार्क! महापालिकेचा नवा प्रकल्प; कधी होणार खुलं?

Pandharpur Politics : 'पाटलांच्या पराभवासाठीच शिंदेंचा भाजप प्रवेश'; मंत्री जयकुमार गोरेंचा आमदार पाटलांना सूचक इशारा

Nashik Kumbh Mela : ऐतिहासिक निर्णय! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या 66 किमी परिक्रमा मार्गाला 7,922 कोटींचा 'हिरवा कंदील'

SCROLL FOR NEXT