Shingnapur Yatra crowd lakhs devotees traffic jam sakal
सातारा

Satara Shingnapur Yatra : शिंगणापूरच्या यात्रेत भाविकांसोबतच समस्याही!

शिखर शिंगणापूर येथील चैत्री यात्रा यंदा लाखो भाविकांच्या गर्दीने फुलली

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

दहिवडी : शिखर शिंगणापूर (ता. माण) येथील चैत्री यात्रा यंदा लाखो भाविकांच्या गर्दीने फुलली. मात्र, या यात्रेत भाविकांसोबतच समस्यांचाही महापूर आल्याच्या चर्चा होती. बेशिस्त वाहनांच्या गर्दीने झालेल्या वाहतूक कोंडीने दोन बळी घेतल्याने यात्रेला गालबोट लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेचे नियोजन गांभीर्याने घेतले नाही. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व राजकुमार भुजबळ यांनी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून यात्रेतील वाहतूक, तसेच बंदोबस्ताचे नियोजन केले.

त्यांच्यासोबत गृहरक्षक दलाचे कर्मचारी, पोलिस पाटीलही होते. मात्र, अनपेक्षितपणे झालेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे नव्हते. वारुळातून मुंग्याबाहेर याव्यात, त्याप्रमाणे लाखो भाविक व हजारो वाहने शिंगणापूरच्या दिशेने आली. मुख्य दिवसापूर्वीच एक-दोन दिवस यात्रास्थळी अनेक भाविक वाहनांसह मुक्कामी होते.

ही वाहने यात्रेदिवशी परतीच्या मार्गाला निघाली अन् वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला. अरुंद रस्त्यावरून ट्रॅक्टरची ट्रॉली, कावड घेऊन निघालेले ट्रक याने वाहतूक कोंडीत भर पडली. त्यातच भर म्हणून एसटीसह काही खासगी वाहने रस्त्यावरच बंद पडली अन् सगळीकडे गोंधळ उडाला. सुमारे चार तास वाहने एकाच जागेवर अडकून पडली.

त्याचा फटका हृदयविकाराचे दोन रुग्णांना बसला. संबंधित रुग्णांना घेऊन निघालेल्या रुग्णवाहिका रुग्णालयात वेळेत न पोचल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. प्रशासनावर यात्रा नियोजन सोपवून ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा समिती मश्गूल राहिली. जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुखांच्या आदेशानुसार त्यांना योग्य नियोजन करण्यात अपयश आले. त्याचा त्रास भाविकांना सहन करावा लागला.

प्रशासनाच्या सूचनांची ऐशी की तैशी

यात्रेत यात्रेकरूंचे बेजबाबदार व बेशिस्त वर्तन दिसून आले. कावडीच्या नावाखाली काही तरुणांकडून घातला जाणारा गोंधळ समर्थनीय नव्हता. कोणालाही न जुमानणार तरुणांचा घोळका नियोजनाचा फज्जा उडवत होता. या गोंधळापुढे प्रशासन हतबल झाले. वाहतूक नियोजन करताना दुचाकीस्वारांची हुल्लडबाजी वाहतुकीचा बोजवारा उडवत होती.

अशी आहे स्थिती...

* वाहतूक कोंडीसाठी प्रांताधिकारी, तहसीलदार रस्त्यावर

* बांधकाम विभागाचे दुर्लक्ष भाविकांच्या जिवावर

* अरुंद व खराब रस्त्यांसोबत लगतची झुडपे वाहतूक कोंडीला कारणीभूत

* उमाबनात खडीकरणामुळे अनवाणी कावड घेऊन जाणाऱ्या भक्तांचे पाय रक्तबंबाळ

* ग्रामपंचायत, यात्रा समितीने कर वसुलीसोबत सुविधाही द्याव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT