Ajinkyatara Fort Satara esakal
सातारा

Ajinkyatara Fort : शिराळ्यातील मुलाची अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या; कुरणेश्वर मंदिराजवळ आढळला मृतदेह

एका अल्पवयीन मुलाने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

सकाळ डिजिटल टीम

त्याचा मृतदेह किल्ल्याच्या कुरणेश्वर मंदिराच्या बाजूला आढळून आला.

सातारा : शिराळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबत कऱ्हाड तालुका पोलिस (Karad Police) ठाण्यात नोंद आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संबंधित मुलगा सातारा जिल्ह्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो रहात असलेल्या ठिकाणी रविवार सकाळी आठपासून आढळून आला नाही. तो रात्री आठपर्यंत न दिसल्याने संबंधितांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत तो गावी आला आहे का, अशी विचारणा केली.

तो गावी आला नसल्याने कुटुंबीय तातडीने कऱ्हाडला आले. शोध घेऊनही तो सापडला नाही, तसेच तो फोनही उचलत नव्हता. त्यामुळे रात्री अकराच्या सुमारास कुटुंबीयांनी त्याचे अपहरण झाल्याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी तातडीने त्याच्या फोनचे लोकेशन शोधले. ते अजिंक्यतारा किल्ल्यावर दाखवत होते.

त्यानुसार रविवारी रात्रीच पोलिस त्या परिसरात आले होते. त्यांनी शोध घेतला; परंतु मुलगा आढळून आला नाही. आज सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. त्या वेळी त्याचा मृतदेह किल्ल्याच्या कुरणेश्वर मंदिराच्या बाजूला आढळून आला. तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT