सातारा

आपमतलबी राजकारणाला शिरवळकरांची मोठी चपराक; राष्ट्रवादीवर आत्मपरीक्षणाची वेळ

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : खंडाळा तालुक्‍यात प्रथमच ग्रामसभेत झालेल्या मतदान प्रक्रियेत शिरवळ ग्रामपंचायतीच्या भाजपच्या विद्यमान सरपंच लक्ष्मीताई पानसरे यांनी अविश्वास ठराव जिंकला. या निमित्ताने खंडाळा तालुक्‍यातील आपमतलबी राजकारणाला मोठी चपराक लगावली आहे. जिल्हा व तालुका पातळीवर काम करणाऱ्या शिरवळच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर नेते व कार्यकर्यांना हा विजय मोठा धक्का देणारा असून, जिव्हारी लागणारा आहे.
 
शिरवळचे सुपुत्र राष्ट्रवादीचे उदय कबुले हे सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची, तर राजेंद्र (अण्णा) तांबे हे खंडाळा पंचायत समितीच्या सभापती व लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे हा अविश्वास ठराव राष्ट्रवादी सहजपणे जिंकेल, असे सर्व स्तरातून तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, प्रत्यक्षात या सर्व तर्कवितर्काना भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लावून मोठा विजय मिळला. हा विजय राष्ट्रवादी कॉंग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारा, तर भाजपच्या दृष्टीने नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारा आहे.

अफझल खान कबर परिसर पर्यटकांसाठी खुला करा; माजी आमदाराची प्रशासनाकडे मागणी
 
दरम्यान, नोव्हेंबर 2017 ला ग्रामपंचायत सरपंच म्हणून भाजपच्या लक्ष्मी पानसरे निवडून आल्यानंतर शिरवळ राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने व अविश्वास ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे नऊ सदस्य असतानाही 15 सदस्यांची गोळाबेरीज झाल्याने अविश्वास ठराव तहसीलदारांच्या कोर्टात दाखल झाला. मात्र, थेट जनतेतून निवडून आल्याने सरपंच गटानेही कंबर कसत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर पानसरे गटाने अविश्वास ठरावावर न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, या याचिकेद्वारे सरपंच गटाला ग्रामसभेतील मतदानाला सामोरे जावे लागले. या वेळेला राष्ट्रवादीच्या गोटातून मतदानाच्या परीक्षेमध्ये आपण सहज जिंकू, अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, पानसरे गटातील सर्व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्धरीत्या केलेला प्रचार कामी आला. त्यामुळे शिरवळमध्ये सरपंचपदावर पुन्हा एकदा भाजपने आपली मोहोर उमटवली. शिरवळच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात आपली मते टाकली. भाजप व शिवसेनेच्या एका गटाला हा विजय बळ देणारा मानला जात असला, तरी ग्रामपंचायतीच्या व अन्य स्थानिक संस्थाच्या आगामी निवडणुकीनंतरच कोण बाजी मारणार हे उमगणार आहे.

विजयी मिरवणुक भाेवली; भाजप सरपंचांसह 52 जणांवर गुन्हा दाखल 

शिरवळमधील विकासकामे पाठीशी
 
भाजपमध्ये कार्यरत असणारी तरुण फळी आणि नुकत्याच बहुजन समाज अनुसूचित जाती, जमाती, बारा बुलतेदार व मुस्लिमांची बांधलेली मोट आणि (कै.) रवींद्र पानसरे यांनी शिरवळमध्ये उभारलेली विकासकामे हे भाजपच्या विजयाच्या कामी आल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT