Shiv Jayanti in Japan esakal
सातारा

Shiv Jayanti : जपानमध्ये पहिल्यांदाच होणार ऐतिहासिक शिवजयंती

सकाळ डिजिटल टीम

21 मार्चला तिथीनुसार शिवजयंतीचा सार्वजनिक कार्यक्रम होणार आहे.

हुमगाव (सातारा) : सगळ्या भारतभर शिवजयंतीचा (Shiv Jayanti) महाउत्सव साजरा होत असताना जपानमध्येही शिवजन्मोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा पार पडत आहे. भारत-जपानच्या (Japan) ७० वर्षांच्या संबंधामध्ये पहिल्यांदाच जपानमध्ये शिवजयंती साजरी होत आहे.

भारत कल्चरल सोसायटी (Bharat Cultural Society) या जपानमधील संस्थेने यावर्षीपासून जपानमधील टोकियो (Tokyo) या शहरात शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केला आहे. भारतीय मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणे, त्यावर आधारित प्रश्नमंजूषा आयोजित करणे आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करणे असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी प्रथमच शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा जपानमध्ये पोचला आहे. शिवजयंतीनिमित्त टोकियोतील राधागोविंद मंदिरात शिवजयंती साजरी झाली.

या कार्यक्रमाला संस्थेचे संदीप गुंडप, अमोल शेलार, नवनीत सिसोदिया, नागभूषण वैद्य, रोहन अग्रवाल, मुकेश गुप्ता, विकास काळे, विकास रंजन, महेश पिंपरीकर, निखिल मयेकर, राजेश आवाके, प्रदीप शरण, विशाल देशपांडे, कुशेन्द्र चौधरी, ओमसाई गुप्ता आदी सदस्य उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त छत्रपतींच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, 21 मार्चला तिथीनुसार शिवजयंतीचा सार्वजनिक कार्यक्रम होईल. भारत कल्चरल सोसायटीने जपानमधील भारतीय दूतावास, हिंदू स्वयंसेवक संघ, टोकियो मराठी मंडळ, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

जपानमध्ये स्थायिक असलो तरी त्या शिवगर्जना आणि छत्रपतींच्या पराक्रमाचे पोवाडे आजही अंगावर शहारे आणतात. जपानमधील भारतातील नवीन पिढीला हा इतिहास समजावा, त्यासाठी चालू वर्षीपासून या उत्सवास सुरुवात केली आहे.

-अमोल शेलार, सिनिअर इंजिनियर, जपान (टोकयो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

Covid-19: अमेरिकेत अचानक कोरोनाचा उद्रेक, नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; भारताला किती धोका?

Pakistani Spy Case: 'ई-रिक्षावाली' निघाली पाकिस्तानी हेर! मीरा ठाकूरचा मुंबई पोलीसशी काय संबंध? वाचा पूर्ण प्रकरण

Latest Marathi News Live Update : अमरावतीत बच्चू कडू पुन्हा आक्रमक; रक्तदानातून शेतकरी आंदोलनाला सुरुवात

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT