Shiv Bhojan Thali Scheme
Shiv Bhojan Thali Scheme esakal
सातारा

'शिवभोजन'ला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ; साताऱ्यात दोन लाख गरीब 'शिवभोजन'मुळे तृप्त!

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे (Corona Lockdown) कष्‍टकरी, गोरगरिबांची अन्नावाचून हेळसांड होऊ नये, यासाठी शासनाने जाहीर केलेल्‍या मोफत शिवभोजन थाळीने (Shiv Bhojan Thali Scheme) सातारा जिल्ह्यात दोन लाख २० हजारांचा टप्‍पा ओलांडला आहे. या योजनेला शासनाने १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, जिल्‍हा प्रशासनाच्‍या (Satara District Government) अनलॉक (Unlock) धोरणानुसार या केंद्रातून सायंकाळचे वितरण मात्र, बंद ठेवण्‍यात आले आहे. (Shivbhojan Thali Scheme Extended Till July 15 By The Government Satara Marathi News)

कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी शासनाने संपूर्ण राज्‍यात पुन्‍हा एकदा लॉकडाउन जाहीर केले.

कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी शासनाने संपूर्ण राज्‍यात पुन्‍हा एकदा लॉकडाउन जाहीर केले. या लॉकडाउनमुळे सर्वसामान्‍य, कष्‍टकरी, हातावर पोट असणाऱ्या जनतेची अन्नासाठी मोठ्या प्रमाणात ओढाताण होऊ लागली. त्‍यांची ओढाताण लक्षात आल्‍यानंतर शासनाने गरजूंना मोफत शिवभोजन थाळी वितरण करण्‍याचा निर्णय घेतला. यानुसार नियुक्‍त केलेल्‍या केंद्रांतून गरजूंना दोन वेळेला शिवभोजन थाळीचे वितरण करण्‍यात येऊ लागले. लॉकडाउनचा कालावधी जसजसा वाढेल, तसतसे या योजनेची व्‍याप्‍ती वाढवत काही अटींमध्‍ये शासनाने शिथिलता आणली. यामुळे त्‍याचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्‍येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यानंतर शासनाच्‍या आदेशानुसार या सेवाकार्यात समाजसेवी संस्‍था, व्‍यक्‍तींना सामावून घेत सायंकाळच्‍या सुमारास गरजूंना त्‍यांच्‍या घराच्‍या परिसरात शिवभोजन थाळी (Shiva Food Plate Scheme) देण्‍याची सुरुवात जिल्ह्यात झाली.

या उपक्रमासाठी जिल्‍ह्यातील अनेकांनी सढळ हस्‍ते मदत, योगदान देत सर्वसामान्‍य, कष्‍टकरी जनतेप्रती असणारी भावना व्‍यक्‍त केली. शासनाने सुरू केलेल्‍या या उपक्रमात खंड पडू नये आणि कोणीही अन्नाविना उपाशी झोपू नये, यासाठी जिल्‍हा प्रशासन, पुरवठा विभाग कार्यरत आहे. शासनाच्‍या जिल्‍हा, तालुका आणि शहरस्‍तरावरील सर्वच विभागांनी एकमेकांशी सांगड घालत हा अन्नयज्ञ १५ एप्रिलपासून जास्‍त गतिमान केला. १५ एप्रिल ते आजअखेर या योजनेतून जिल्ह्यात दोन लाख २० हजार इतक्‍या शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्‍यात आले आहे. या थाळ्यांच्‍या माध्‍यमातून आपली पोटातील आग क्षमवत गरजूंनी कोरोनाविरोधातील लढ्यात आपले योगदान नोंदवले आहे.

अर्थचक्र गतिमान होण्‍यास थोडा वेळ जाणार

लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया जिल्‍हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असली तरी अनेकांच्‍या हाताला त्‍यांच्‍या गरजेइतका रोजगार प्राप्‍त झालेला नाही. लॉकडाउनमुळे ठप्‍प झालेले अर्थचक्र गतिमान होण्‍यास आणखी काही कालावधी लागणार असल्‍याने शासनाच्‍या आदेशानुसार शिवभोजन थाळीच्‍या माध्‍यमातून सुरू असणारा जिल्‍हा प्रशासनाचा अन्नयज्ञ १५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

Shivbhojan Thali Scheme Extended Till July 15 By The Government Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT