Shivendra Raje Bhosale 6 crore 70 lakhs fund for development works municipal satara sakal
सातारा

Shivendra Raje Bhosale : पालिका हद्दीतील कामांसाठी ६ कोटी ७० लाख

शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; हद्दवाढीसह शहरातील ३८ विकासकामे लागणार मार्गी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा पालिका हद्दीतील विविध प्रकारची ३८ विकासकामांसाठी नगर विकास विभागामार्फत ६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

उपलब्‍ध निधीतून प्रभाग दोनमधील जवान हौसिंग सोसायटी ते कसई गल्ली रस्‍त्‍यासाठी १९ लाख, सैनिकनगर बस स्टॉप ते कोयना सोसायटी रस्‍त्‍यासाठी १९ लाख, महेश कामठी घर ते युवराज पवार रस्‍त्‍यासाठी तसेच कामाठीपुरा सावित्रीबाई फुले उद्यानासाठी १६ लाख,

छत्रपती अभयसिंहराजे भोसले कमान ते संत गाडगे महाराज मठ ते मस्जिद अखेर रस्‍त्‍यासाठी १० लाख, प्रभाग एकमधील जय मल्हार सोसायटीअंतर्गत रस्‍त्‍यासाठी १० लाख, प्रभाग तीन पिरवाडी येथील अंतर्गत रस्‍त्‍यासाठी २५ लाख रुपयांचा निधी आहे.

प्रभाग २२ मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते, प्रभाग दोनमध्ये व्यायामशाळा, खेळणी तसेच हायमास्‍टसाठी २५ लाख, प्रभाग १९ मध्ये पॉवर हाउस ते वेताळ बाबा मठाजवळ गटार, संरक्षक भिंत, काँक्रिट पायऱ्यांसाठी ४७ लाख, मंगळवार पेठेतील त्रिगुणे चौक ते सुयोग मंगल कार्यालय रस्‍त्‍यासाठी १५ लाख, शाहूनगर साई कॉलनी प्रतापसिंह कॉलनी येथील अजिंक्यतारा रस्‍त्‍यासाठी १० लाख, साई कॉलनीतील अंतर्गत रस्‍त्‍यासाठी १० लाख,

प्रभाग १० शाहूपुरी चौक ते समता पार्क रस्‍त्‍यासाठी ३४ लाख, प्रभाग २१ गुरुवार बाग सुशोभीकरणासाठी १३ लाख, प्रभाग १० मधील शिवाजीनगर रस्‍त्‍यासाठी २८ लाख, देवी कॉलनीतील खुली जागा सुशोभीकरण, जिम साहित्यासाठी १५ लाख, गोडोलीतील जय शिवराय व्यायाम मंडळाच्‍या जिम साहित्‍यासाठी १० लाख, प्रभाग ८ तामजाईनगरमध्ये रस्‍ता, गटारसाठी १३ लाखांचा निधी मंजूर आहे.

गुरुवार बाग ते भावे बोळ, रेणुकामाता मंदिर गुजर बोळ रस्‍त्‍यासाठी ३३ लाख, शनिवार पेठ अतारवाडा बोळ पूल बांधणे १८ लाख, माची पेठ पुलासाठी १४ लाख, एलआयसी कॉलनीतील रस्‍त्‍यांसाठी १५ लाख, शाहूपुरीच्‍या जयविजय सोसायटीत बास्केटबॉल कोर्ट, वॉकिंग ट्रॅकसाठी २० लाख, दौलतनगर शिल्प अपार्टमेंट ते कॅनॉल रस्‍त्‍यासाठी २३ लाख,

गुरुवार पेठेतील समाजमंदिराच्‍या पहिल्‍या मजल्‍यासाठी २५ लाख, गडकर आळी ते धुमाळ आळी रस्‍त्‍यासाठी ३४ लाख, भैरोबा पायथा रस्‍त्‍यासाठी १० लाख, बुधवार पेठेतील प्रभाग ७ येथे काँक्रिट रस्‍ता, गटारसाठी २० लाख, रामराव पवार नगरमधील सभागृहासाठी २४ लाख, प्रभाग १७ मधील गोळीबार मैदान परिसरातील हायमास्टसाठी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

बापूजी साळुंखे नगरमधील रस्‍त्‍यांसाठी १७ लाख, सप्ततारा कॉलनीसाठी १५ लाख, अवी कॉलनीसाठी १० लाख, समर्थ मंदिर ते फुटका तलाव रस्‍त्‍यासाठी १४ लाख, शाहूपुरीच्‍या श्रीराम कॉलनीतील जागा सुशोभीकरणासाठी १४ लाख, सोमवार पेठेतील सभागृह कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT