Udayanraje Bhosale esakal
सातारा

सगळी नौटंकी सुरू आहे, म्हणून दुचाकीवरुन फिरावं लागतंय

पोस्‍टरबाजीच्‍या खर्चात एखादे काम झाले असते

गिरीश चव्हाण

सगळी नौटंकी सुरू आहे. हातातील संधी निघून गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले आहे.

सातारा : शहरात विविध कामांच्‍या प्रारंभाची पोस्‍टरबाजी सुरू आहे. पोस्‍टरबाजीचा खर्च पालिकेतून (Satara Municipal Election) केला असेल, तर त्‍या खर्चातून एखादे छोटेमोठे विकासकाम पूर्ण झाले असते. कोणतरी दुचाकीवरून फिरल्‍याचेही माझ्‍या वाचनात आले. पाच वर्षे पालिकेची सत्ता तुमच्‍या ताब्‍यात आहे. या पाच वर्षांत सातारकरांची कामे केली असती, तर दुचाकीवर फिरायची वेळ आली नसती, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी उदयनराजेंवर (MP Udayanraje Bhosale) नाव न घेता पत्रकार परिषदेत केली.

शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘सगळी नौटंकी सुरू आहे. हातातील संधी निघून गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले असून, आगामी काळात पब्‍लिकच त्‍यांच्‍या नौटंकीवर पडदा टाकणार आहे. पाच वर्षे सत्ता असतानाही त्‍यांना साताऱ्याच्‍या विकास करता आलेला नसून त्‍यांनी कामांच्‍या माध्‍यमातून सातारकरांची स्वप्नपूर्ती करणे आवश्‍‍यक होते. पालिकेला भ्रष्‍टाचाराचा अड्डा बनवत सत्ताधाऱ्यांनी अंदाधुंद कारभार केला आहे. याविरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवत असले, तरी बहुमताच्‍या जोरावर तो आवाज दाबण्‍यात येत आहे. कोविडच्‍या नावाखाली सर्वसाधारण सभा न घेता भ्रष्‍टाचार दडपण्‍याचा प्रयत्‍न सत्ताधारी करत आहेत.’’ सत्ताधाऱ्यांनी राबविलेल्‍या प्रत्‍येक उपक्रमात भ्रष्‍टाचार असून, निवडणुकांच्या तोंडावर कामे न करता बिले काढण्‍याची त्‍यांची तयारी सुरू असल्‍याचा आरोपही त्‍यांनी या वेळी केला.

आमचे नगरसेवक कमी असूनही त्‍यांनी सातारकरांच्‍या विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्‍यावर भर दिला आहे. काम झाले तर माझ्‍यामुळे आणि नाही झाले तर ते दुसऱ्यामुळे हा सत्ताधारी आघाडीच्‍या नेत्‍यांचा पायंडा आहे. दुसऱ्याच्‍या कामांचे श्रेय लाटणाऱ्या सत्ताधारी आघाडीच्‍या नेत्‍यांना सातारकरांशी काहीही देणेघेणे नसल्‍याचे दिसून येत आहे. आपण कोणते प्रकल्‍प राबवतो, त्‍याचा सातारकरांना काय फायदा होतोय, याचे भान देखील त्‍यांना नाही. ग्रेड सेपरेटरचा सातारकरांना किती फायदा झाला, त्‍याचा वापर किती जण करतात, हे तपासणे गरजेचे आहे. त्‍या ग्रेड सेपरेटरच्‍या फलकावरील संकल्‍पक म्‍हणून एक नाव होते. ग्रेड सेपरेटरचा वापर दिवसेंदिवस कमी होत असून, आगामी काळात त्‍याला प्रेक्षणीयस्‍थळाचा दर्जा द्यावा लागेल. त्‍यामुळे का होईना, बाहेरचे पर्यटक येतील व त्‍याचा वापर करतील, अशी कोपरखळीही त्‍यांनी उदयनराजे यांना मारली.

नगराध्‍यक्षांचे ग्रहमान चांगले

पालिका आणि नगराध्‍यक्षांच्‍या कारभाराबाबत विचारले असता, शिवेंद्रसिंहराजे, या थेट नगराध्‍यक्षांचे ग्रहमान चांगले दिसते. त्‍यांची पत्रिका चांगली दिसते. कितीही आरोप झाले तरी त्‍या कार्यरत आहेत. यापूर्वीही एक लोकनियुक्‍त थेट महिला नगराध्‍यक्षा होत्‍या. त्‍यांना तर रजेवर जावे लागले होते. तशी वेळ या नगराध्‍यक्षांवर आली नाही, असे वक्‍तव्‍य त्‍यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

John Cena Retired : भारतीयांचा 'लाडका' जॉन सीना निवृत्त... WWE मधील शेवटच्या लढतीत दिग्गजांच्या उपस्थितीत भावूक, Video

Brown University Firing : परीक्षेवेळी गोळीबार, शेवटचा पेपर देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ८ जण जखमी

Salman Ali Agha: वर्ल्डकप तिकीट विक्रीच्या पोस्टरवरून सलमानला वगळले; पाकिस्तान क्रिकेट मंडळ ‘आयसीसी’वर नाराज

Success Story: रोहित पालची स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी; राज्यात प्रथम, सहायक वनसंरक्षक पदावर होणार नियुक्ती

Latest Marathi News Live Update: पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार

SCROLL FOR NEXT