नागठाणे : शिवराष्ट्र ट्रेकर्स या संस्थेतर्फे दोन मोटारसायकल मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. त्यात दक्षिण अन् मध्य भारतातील मोहिमांचा समावेश होता. शिवराष्ट्र ट्रेकर्स या संस्थेतर्फे दर वर्षी विविध प्रकारच्या दुर्गभ्रमंती मोहिमांचे आयोजन करण्यात येते. यंदा संस्थेने दुचाकीवरून या मोहिमा आयोजिल्या होत्या. त्यातील सहभागी सदस्यांनी विविध गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे आदींना भेटी दिल्या.
राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेत प्रदीप सावंत, सोहम जाधव, हेमंत जाधव हे सहभागी झाले. साताऱ्यापासून ही मोहीम सुरू झाली. त्यानंतर कर्नाटकातील बदामी, पट्टद्दकल, ऐहोळे, चित्रदुर्ग, कृष्णगिरी, जिंजी, पुद्दुचेरी, अरकोट, वेल्लोर, अल्लागड्डा, गाणगापूर, सोलापूर, पंढरपूर, सातारा असे मोहिमेचे मार्गक्रमण झाले. दुसरी मोहीम सातारा, मोरगाव, शिर्डी, प्रकाशा, महेश्वर, इंदोर, उज्जैन, रावेरखेडी, ओंकारेश्वर, शेगाव अशी झाली.
या मोहिमेचे नेतृत्व रमेश चव्हाण यांनी केले. त्यात उद्धव पवार, रामचंद्र पवार, विजय राऊत, समर्थ चव्हाण हे सहभागी झाले. मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांचा शौर्यपत्र देऊन विशेष सत्कार आयोजिण्यात आला.
या वेळी शिवराष्ट्र ट्रेकर्सचे अध्यक्ष सचिन सावंत, सचिन जाधव, संतोष जगताप, मधुकर शिंदे, त्र्यंबक घाडगे, राजेंद्र घोरपडे, अरुण घोरपडे, विठ्ठल ढाणे, सतीश चव्हाण, अरुण कदम, जालिंदर कदम, सतीश राजेघाडगे, नीलेश पोरे, रमेश राठोड, सुनील माने, सुनील जांभळे, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.
सततच्या अतिवृष्टीमुळे मोहिमेत अनेकदा अडथळे आले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ इच्छाशक्ती व ध्येय यामुळे ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करता आली.
- राजेश पवार, मोहीम प्रमुख
बाईक राइडचे हे सलग तिसरे वर्ष होते. स्वाभाविकच पूर्वानुभव पाठीशी होता. त्यातून अचूक नियोजन करून ही मोहीम सहा दिवसांत पूर्ण केली, याचा अभिमान वाटतो.
- रमेश चव्हाण, मोहीमप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.