सातारा

भाविकांनाे! पुसेगावात तीन दिवस जमावबंदी, संचारबंदी लागू

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : यावर्षी श्री सेवागिरी महाराजांचा यात्रा कालावधी 18 जानेवारी पर्यंत असून, 12 जानेवारी या मुख्य दिवशी श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव आहे. यात्रेस राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता असल्याने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा होण्याची शक्‍यता असल्याने प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी 11 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत येथे जमावबंदी व संचारबंदी लागू करण्याचा आदेश दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

यावर्षी 18 जानेवारी पर्यंत श्री सेवागिरी महाराजांचा यात्रा कालावधी आहे. यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून लाखो भाविक येतात. सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमणात सुरू आहे. यात्रा कालावधीत पुसेगाव व परिसरात मोठ्या संख्येने भाविक एकत्र येण्याची शक्‍यता असल्याने सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी 11 ते 13 जानेवारी या कालावधीत पुसेगाव येथे जमावबंदी व संचारबंदी आदेश जारी करण्याची विनंती केली होती. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशान्वये या कालावधीत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक तसेच उत्स्फूर्तपणे गुलाल उधळणे, फटाके फोडणे यासाठी मनाई करण्यात आली आहे.

माताजी ओ काळम्मावाडी का धोंडा आपने बिठाया था उसका क्या हुआ?अशी काेल्हापूरकरांनी इंदिराजींना आठवण करुन देताच सुटला धरणाचा प्रश्न

रथोत्सवादिवशी (ता.12) पुसेगावमधील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अंत्यविधी, शासकीय कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मी पाचवडला जाऊन येतो, असे सांगून घरा बाहेर पडलेल्या मुलाचा झाला खून! 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT