shrinivas patil sakal
सातारा

शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्यासाठी 35 कोटी मंजूर

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कर्हाड : सातारा जिल्ह्यातील महाड ते भोर ते शिरवळ रस्त्यातील शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याचे कामासाठी ३५ कोटी रूपये मंजुर झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून वार्षिक आराखड्यातंर्गत काम मंजूर झाले आहे.

सातारा जिल्ह्यातून रायगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्ती, रूंदीकरण व मजबुतीकरण कामाचा वार्षिक आराखड्यात समावेश केला आहे. जिल्हा हद्दीतील शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याच्या कामासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खासदार पाटील यांच्या पाठपुरव्याने निधी मंजूर झाला आहे.

त्यातून रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम होणार आहे. जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यासंदर्भात खासदार पाटील यांनी त्या रस्त्याची दुरुस्तीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. याविषयी पाठपुरावा करून त्यांना तशी सूचना केली होती. त्यानुसार या कामास २०२०-२१ वार्षिक आराखड्यात मंजुरी मिळाली आहे. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे व वाहनधारकांचे दळणवळण सुखकर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - पंढरपुरात जोरदार पाऊस

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT