सातारा

प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघाेषात नागठाणेतील श्रीराम रथोत्सव साजरा

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : येथील आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांचा रथोत्सव नुकताच साधेपणाने पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी केवळ मान्यवरांच्या उपस्थितीतच रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रथेप्रमाणे दर वर्षी निघणारी रथाची मिरवणूक यंदा प्रथमच रद्द करण्यात आली.

नागठाणे येथील श्रीराम रथोत्सव जिल्ह्यातील प्रमुख यात्रांपैकी एक मानला जातो. रथोत्सव काळात येथे आयोजित करण्यात येणारा जनावरांचा बाजार पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध मानला जातो. या रथोत्सवाचा मुख्य दिवस होता. मात्र, कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खासदार श्रीनिवास पाटील, सागर पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, भाग्यश्री मोहिते यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण साळुंखे, सरपंच डॉ. रूपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, पोलिस पाटील रमेश साळुंखे, श्रीराम देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, सोसयटीचे पदाधिकारी, तसेच ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता; महाविकासच्या निर्णायवर उदयनराजेंनी केली भुमिका स्पष्ट

तेरे संग यारा खुशरंग बहारा.. पाचगणी, महाबळेश्वरच्या सुखद गारव्यात व्यक्त करा प्रेम 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire Breaks Out at Mahape MIDC : नवी मुंबईतील महापे MIDC मध्ये अग्नितांडव, केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अमेरिकेत भारतीयानं पत्नीसह ३ नातेवाईकांची केली हत्या; घरात सापडले ४ मृतदेह

Neelam Gorhe: धक्कादायक! प्री प्रायमरी शाळा गुमास्ता लायसनवर, सरकारी नियंत्रण नाही; उपसभापती गोऱ्हेंची माहिती

Viral Video : "रोज 300 रुपये हप्ता घेऊनही माझ्या दुकानावर कारवाई का केली?" डोंबिवलीत मराठी तरुणीचा टाहो; भावुक करणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi news Live Update: नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील कंपनीला आग

SCROLL FOR NEXT