सातारा

सातारा : 'या' तालुक्‍यातून सहा युवक वर्षभर तडीपार

प्रवीण जाधव

सातारा : मारामारी व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल असलेल्या कऱ्हाड शहरातील सहा जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी कऱ्हाड तालुका हद्दीतून तडीपार केले आहे. प्रद्युम्न ऊर्फ पद्या दीपक सोळवंडे (वय 25), रोहित रमेश कारंडे (वय 23), मनोज महादेव जाधव (वय 23), विजय शिवाजी घारे (वय 32), अमोल जगन्नाथ भोसले (वय 34, सर्व रा. महात्मा फुले चौक, बुधवार पेठ, कऱ्हाड) व ओंकार युवराज थोरात (वय 24, रा. ओंड, ता. कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत.
पुण्यातील सातारकरांसाठी उदयनराजेंचा पुढाकार
 
सर्वांवर टोळीने गर्दी-मारामारी, खुनाचा प्रयत्न व बेकायदा हत्यार बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. वर्तनात सुधारणा होण्यासाठी त्यांच्यावर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली; परंतु त्यांच्यात सुधारणा झाली नाही. हद्दपारी प्रस्तावाची सुनावणी सुरू असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय गोडसे यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सुनावणी घेऊन त्यांनी सहा जणांना एक वर्षासाठी कऱ्हाड तालुक्‍यातून तडीपार केले आहे. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे दहशत पसरवणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करणार असल्याच इशारा अधीक्षक सातपुते यांनी दिला आहे. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

चार महिन्यांनंतर या शहरात कोरोनाचा शिरकाव


सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे सावट

वायरमनचा मृत्यू; तिघांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा 


सातारा जिल्हा प्रशासनाने दुकानांची वेळ बदलली. सकाळी नऊ ते दुपारी दाेन पर्यंतच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Agriculture News : वाटाणा-शेवगा २०० रुपये किलो! अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्य ग्राहक हैराण

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन पठ्ठ्यांनी मोडला मार्क झुकरबर्ग यांचा विक्रम!

SCROLL FOR NEXT