Just 15 Days Before Leave, Soldier Arjun Jadhav Attains Martyrdom in Uri Sector

 

sakal

सातारा

Soldier Martyred : मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्न अपूर्ण : 5 दिवसांनंतर सुट्टीवर येणारे अर्जुन जाधव उरीमध्ये शहीद

Indian Army jawan martyred near Line of Control in Uri: उरी सेक्टरमधील स्फोटात शहापूरचा सुपुत्र अर्जुन जाधव वीरमरण पावल्याने गावात शोककळा; १५ जूनला सुटीवर येऊन मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न चुरडले

सकाळ वृत्तसेवा

कोपर्डे हवेली : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असलेले शहापूर (ता. कऱ्हाड) येथील जवान हॅण्ड ग्रेनेडच्या स्फोटात हुतात्मा झाले. अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) असे या जवानाचे नाव आहे. त्यांच्या जाण्याने शहापूरसह परिसरात शोककळा पसरली आहे.

शहापूरमधील अर्जुन जाधव हे गेल्या नऊ वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहेत. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते. सध्या जम्मू- काश्मीरमधील आठ आरआरमध्ये ते कार्यरत होते. उरी सेक्टरमध्ये त्यांची नियुक्ती होती. उरी सेक्टरमध्ये मंगळवारी उशिरा कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालताना भीषण स्फोट झाला. त्यात लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले. ते दोघेही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यात अर्जुन यांचा समावेश आहे.

अन्य सहकाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी श्रीनगरच्या बदामीबाग येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वीरमरण आलेले दुसरे जवान विक्रम चव्हाण हे ऐरोली (नवी मुंबई) येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

स्फोट नेमका कशामुळे झाला? तो भूसुरुंग होता, की अन्य कोणत्या कारणामुळे झाला? याचा तपास लष्कराकडून केला जात आहे. दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव कायदेशीर प्रक्रियेनंतर लष्करी इतमामात त्यांच्या मूळगावी रवाना केले जाणार आहे. शुक्रवारी (ता. १२) त्यांचे पार्थिव शहापूरला येईल, असे सांगितले जात आहे. अर्जुन यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्यांचा लहान भाऊ ऋषी हे नौदलात कार्यरत असून, ते सध्या सुटीवर गावीच आहेत.

खबरदारी घेऊनही...

अर्जुन यांचा लहान भाऊ ऋषी हे सध्या गावीच आहेत. त्यांना अर्जुन यांना वीरमरण आल्याची बातमी सकाळी समजली. ही बातमी ऐकून त्यांना धक्काच बसला. मात्र, स्वतःला सावरत त्यांनी हा धक्का घरातील अन्य लोकांना सहन होणार नाही, हे ओळखून अर्जुन यांना वीरमरण आल्याची बातमी पाेहोचू न देण्याची खबरदारी घेतली. त्यासाठी गावातील लोक घरापासून काही अंतरावर थांबून त्यांच्याकडे येणाऱ्या पै- पाहुणे व अन्य लोकांना तेथूनच परत पाठवून देण्याची व्यवस्था केली होती. मात्र, अनेकांनी वीरमरण आलेल्या अर्जुन यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट, स्टेटस समाज माध्यमावर ठेवल्याने कुटुंबातील लोकांपर्यंत ही दुर्दैवी बातमी पोहोचली. त्यानंतर घरातील लोकांनी त्याची खातरजमा करण्यासाठी अर्जुन यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाल्याने रडू कोसळले.

मुलाच्या वाढदिवसाचे स्वप्न अपुरे

अर्जुन यांचा मुलगा सर्वेशचा २५ जूनला पहिला वाढदिवस होत आहे. तो साजरा करण्याची त्यांनी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी ते १५ जूनला सुटीवर घरी शहापूरला येणार होते. मात्र, त्यापूर्वीच झालेल्या दुर्दैवी स्फाेटात त्यांना वीरमरण आल्याने जाधव कुटुंबासह संपूर्ण शहापूरवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT