St Worker Strike
St Worker Strike 
सातारा

St Worker Strike : एसटी संपाचा आठशे विक्रेत्यांना फटका

संजय साळुंखे

सातारा : गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकांतील आणि प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या सुमारे ८०० व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनानंतर व्यवसाय रुळावर येत असतानाच एसटी बंदच्या परिणामांना सामोरे जाताना या व्यावसायिकांना आर्थिक विवंचनेलाही तोंड द्यावे लागत आहे.

एसटी कमर्चाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सातारा विभागाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर एसटी बंद असल्याने प्रवासी ग्राहकांवर विसंबून असणाऱ्या अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. या आंदोलनामुळे कॅन्टीन, मोबाईल रिचार्ज, फळे, बेकरी, रसवंतीगृह, हॉटेल, विविध खाद्यपदार्थ विक्रेते तसेच इतर अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यवसायातील पैशांवर गुजराण होणाऱ्या व्यावसायिकांची सध्या आर्थिक ओढाताण सुरू आहे.

जिल्ह्यात ११ आगार आहेत, तर ३८ बस स्थानके आहेत. १३६ मार्गस्थ निवारे आहेत. जिल्ह्यातून दररोज ७६१ बस धावतात. महामंडळाने काहींना विक्री परवानेही दिलेले आहेत. त्यांची संख्या सुमारे २०० आहे. विविध बस स्थानक व परिसरात ८०० हून अधिक विक्रेते आहेत. सातारा, कऱ्हाड, फलटण, वाईसह विविध आगारांतील स्थानकांवर एसटीतर्फे व्यावसायिकांना करार पद्धतीने भाडेपट्टीवर गाळे दिले आहेत. ११ बस स्थानकांमध्ये एसटी कॅन्टीनही सुरू आहेत.

व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. या सर्वांना आंदोलनाचा फटका बसताना दिसतो. फळविक्री आणि बेकरी व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात शुकशुकाट जाणवत असल्याने विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.

कर्नाटकातील एसटी सेवा सुरू असली, तरी दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने आणि महाराष्ट्रात सेवा सुरू केल्यास आंदोलनाच्या धास्तीमुळे कर्नाटकातील एसटी गाड्या साताऱ्यातील मार्गावर धावताना दिसत नाहीत.

"एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सध्या बस स्थानकांत लॉकडाउनसारखी स्थिती आहे. दररोज १०० रुपयेही धंदा होत नाही. शिवाय तयार मालही खराब झाला आहे. कच्चा माल, वितरकांकडून घेतलेला मालही मुदत संपल्याने खराब होत आहे. एकूणच या संपाचा व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे."

- विरेंद्र इंगळे, कॅन्टीन परवानाधारक

आकडे बोलतात

  • एकूण एसटी आगार : ११

  • बस स्थानकांची संख्या : ३८

  • परिवहनचे दुकान गाळे : २००

  • दैनंदिन प्रवासी संख्या : ३ लाख ३३ हजार

  • दररोजच्या बसची संख्या : ७६१

  • व्यावसायिकांची संख्या : ८००

  • परवानाधारक विक्रेते : २००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT