पंधरा दिवसांत कारखाना सुरु करा : मदन भोसले  sakal
सातारा

पंधरा दिवसांत कारखाना सुरु करा : मदन भोसले

अशपाक पटेल

खंडाळा (सातारा) : खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता किसनवीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत.हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा.असे आव्हान आमदार यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधारींना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पञकार परिषेदत केले.

यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे,किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर,संचालक सी.व्ही.काळे, राहुल घाडगे,चंद्रकांत इंगवले,रतनसिंह शिंदे,सचिन सांळुखे,प्रविण जगताप,प्रताप यादव व किसनवीर कारखान्याचे संचालक,चंद्रकांत यादव व कार्यकर्ते उपस्थित होते. मदन भोसले पुढे म्हणाले,नवनिर्वाचित सत्ताधारी यांना हवी ती मदत करायला तयार आहे.आम्ही शेतकऱ्यांसाठी हा कारखाना जिवाचे रान करुन उभा केला आहे.म्हणून कोणालाही याचे आॕडीट करायचा अधिकार नाही,हिशोब मागता काय,कारखाना उभारणीस का धावुन आला नाही 0 असे प्रश्न विचारण्यापेक्षा उभा केलेला कारखाना 15 दिवसात सुरु करा,यासाठी भागिदारीचा 18 वर्षाचा करार आठ दिवसात तडजोड करायला तयार आहे.

आपणास उपमुख्यमंञी अजित पवार,सहकार मंञी बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा मध्यवती बँकेची सुध्दा साथ आहे.म्हणून करार मोडायला वर्षभर लागणार नाही,सर्व मदत करायला तयार आहे.माञ स्वतःच्या जमीनी तारण ठेवणार् या संचालकांना वार् यावर सोडु नका ,अशी अपेक्षा व्यक्त केली.

खंडाळा कारखाना निवडणुकीत आलो नाही याबद्दल बोलताना श्री भोसले म्हणाले,खंडाळ्याच्या राजकारणात मी ढवळाढवळ करत नाही.तसेच मला बोलविण्यात ही आले नाही.यावर गाढवे सरांना विचारा.याबाबत शंकरराव गाढवे यांनी ही दुजोरा दिला.

मोठा जिवाचा रान करुन हा कारखाना उभा केला.यासाठी खुप यातना ही सोसल्या आहेत.म्हणून माझ्या कामाचे आॕडिट करु नका,यावेळी कोणीही ईकडे फिरकले सुध्दा नाही.तरी याविषयावर बोलण्यापेक्षा हा कारखाना त्वरीत सुरु करावा.एवढीच माफक अपेक्षा मदन भोसले यांनी या पञकार परिषदेत व्यक्त केली,तसेच सुरुवातीलाच निवडुन आलेल्या सर्व संचालकांचे त्यांनी अभिनंदन ही केले. या पञकार,परिषदेत आभार मानताना शंकरराव गाढवे म्हणाले,शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा केला.यासाठी मदनदादाचे सहकार्य मिळाले.सहकारला हा शेवटचा असणारा कारखाना सहकाराचाच राहवा अशी अपेक्षा व्यक्त केली.

शंकरराव गाढवे यांचा वाढदिवस असताना अपेक्षा व्यक्त केली,कि माझे सर्व स्वप्न पुर्ण झाले आहेत.माञ म्हवशीच्या माळरानावर खंडाळा कारखाना उभा करण्यासाठी किसनवीरने मदत करावी.आणि याच अपेक्षापुर्ती साठी किसनवीर ने खंडाळा कारखान्यासाठी मदत केली असल्याची आठवण किसनवीरचे अध्यक्ष मदन भोसले यांनी यावेळी सांगितली. करखाना निवडणुक पराभवानंतर मदनदादा काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.माञ मदन भोसले यांनी कारखाना उभा करण्यासाठी मदत करण्याची भुमिका येथे मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

SCROLL FOR NEXT