सातारा

कुस्ती आखाड्यांसह व्यायामशाळा सुरू करा : मल्लविद्या महासंघाची मागणी

प्रशांत घाडगे

सातारा : खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्‌म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, तसेच बंद असलेले कुस्ती आखाडे व व्यायामशाळा सुरू कराव्यात, या मागण्यांचे निवेदन कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे प्रशासनाला देण्यात आले. 

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. कोरोना संसर्गामुळे सध्या गावोगावचे कुस्ती आखाडे व व्यायामशाळा बंद आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम करणाऱ्या पैलवानांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कुस्ती आखाडे होत नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्याही निर्माण झाल्या आहेत. 

त्यामुळे कुस्ती आखाडे व गावागावांतील व्यायामशाळा सुरू कराव्यात, तसेच ऑलिंपिकवीर (कै.) खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्‌म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे व साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांना देण्यात आले. या वेळी "कुस्ती मल्लविद्या'च्या जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष पैलवान अमर साबळे, कऱ्हाड तालुकाध्यक्ष संग्राम माने, सातारा तालुका कार्याध्यक्ष मनोज शहा, सातारा तालुका शाखेचे प्रवक्ते सागर डांगे उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT