Democratic Aghadi esakal
सातारा

सातारा पालिकेच्या धर्तीवर कऱ्हाडची घरपट्टी माफ करा

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : सातारा पालिकेच्या धर्तीवर कऱ्हाड नगरपालिकेने (Karad Municipality) मागीलसह याही वर्षाच्या लॉकडाउनमधील (Lockdown) बंद वाणिज्य मिळकतींची घरपट्टी माफ करावी, असे निवेदन लोकशाही आघाडीने मुख्याधिकारी रमाकांत डाके (Ramakant Dake) यांना दिले. (Statement To Officer Ramakant Dake Of Democratic Aghadi At Karad Satara Marathi News)

शहरातील नागरिकांची संपूर्ण घरपट्टी माफ होण्यासंदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केलेला ठराव शासकीय मंजुरीस पाठवला आहे.

आघाडीचे नेते जयंत पाटील, विरोधी गटनेते सौरभ पाटील, नगरसेवकांनी डाकेंची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील माहिती ः गेल्या वर्षी जवळपास तीन महिने देश पूर्ण लॉकडाउनमध्ये होता. या काळात पालिकेच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिली जात आहे. पालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी कऱ्हाडकर नागरिकांच्या सेवेसाठी झटत आहेत. परंतु, कोरोनाच्या प्रसारामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे.

या संदर्भात शहरातील नागरिकांची संपूर्ण घरपट्टी माफ होण्यासंदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केलेला ठराव शासकीय मंजुरीस पाठवला आहे. सातारा पालिकेने घरपट्टी माफ केली आहे. त्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून व नगरपरिषद अधिनियमांतील तरतुदींचा अभ्यास करता बंद असलेल्या मिळकतधारकांची घरपट्टी माफ करण्याचे अधिकार हे स्थानिक नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस आहेत, असे लक्षात येते. निवेदन देताना नगरसेवक मोहसीन आंबेकरी, सुहास पवार, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, पोपटराव साळुंखे, अनिल धोत्रे, रणजित पाटील, पप्पू वाडकर, अमीन शिंदे उपस्थित होते.

Statement To Officer Ramakant Dake Of Democratic Aghadi At Karad Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT