Mahabaleshwar Strawberry
Mahabaleshwar Strawberry esakal
सातारा

Mahabaleshwar Strawberry : कंपन्यांकडून स्ट्रॉबेरीला मिळेना भाव; शेतकरी सापडला आर्थिक संकटात!

रविकांत बेलोशे

औषधे (Medicines) आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या असताना दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

भिलार : महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी (Strawberry) सध्या वातावरणाच्या बदलाने अडचणीत आला असतानाच स्ट्रॉबेरीचे दरामुळे आणखी आर्थिक संकटात सापडला आहे. कंपन्या बाहेरील जिल्ह्यातून दोन आणि तीन नंबरच्या माल कमी दरात आणत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाचे दर पडले आहेत.

कंपन्यांकडून गेल्या वर्षीपेक्षा निम्मा दर मिळत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील बहुतांश गावांतील शेतकऱ्यांचे जीवनमान स्ट्रॉबेरी या पिकावर अवलंबून आहे. कठोर मेहनत आणि लहान मुलासारखे नाजूक पीक सांभाळताना शेतकऱ्याला नाकीनऊ आले आहे. औषधे (Medicines) आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या असताना दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पिकावलेली स्ट्रॉबेरी फळ शेतकरी मुंबई, पुण्यासह इतर राज्यांत विक्रीसाठी पाठवतात. काही शेतकरी आपला माल परदेशातही पाठवतात. त्यामुळे या फळाला चांगला भाव मिळतो आणि त्यातील उरलेला दोन नंबर आणि तीन नंबर माल हा स्थानिक सोसायट्यांना शेतकरी घालतात.

या सोसायट्या हा माल स्थानिक जेली, जाम बनवणाऱ्या कंपन्यांना देतात. यामुळे स्थानिक शेतकरी, सहकारी सोसायट्या आणि कंपन्या यांचे चांगले आर्थिक चक्र फिरते; परंतु अलीकडे या कंपन्या दुसऱ्या जिल्ह्यातून कमी दरात माल आणत आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा माल या कंपन्या कवडीमोल भावात घेत आहेत.

अशी आहे स्थिती

  • कंपन्यांनी गेल्या वर्षी ५० रुपये प्रतिकिलो भाव दिला होता

  • तो दर आता २५ रुपयांवर आला आहे.

  • कर्ज काढून लावलेल्या स्ट्रॉबेरीचे कर्ज कसे फेडणार

  • कंपन्यांनी अन्य जिल्ह्यातून माल आणून शेतकऱ्यांना बेरोजगार करू नये.

खत व औषधे यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत; पण आमच्या मालाला दर मिळत नाही. सध्या येथील कंपन्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम करीत आहेत. दर पाडून शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचा यांचा डाव आहे. प्रसंगी दरासाठी आपण या कंपन्यांसमोर आंदोलन करणार आहे.

-शिवाजी भिलारे, शेतकरी

आम्ही शेतकऱ्यांना दरासाठी नेहमी आघाडीवर असतो. यावर्षी आमच्या चारही सोसायट्यांनी या कंपन्यांबरोबर बैठक घेऊन ५० रुपये दराचा ठराव केला आहे; पण कंपन्यांनी खासगी एजंटाकरवी तालुक्या बाहेरून माल आणून पर्याय उभा केला आहे. त्यामुळे शेतकरी नुकसानीत आहे; पण आम्ही पुन्हा या कंपन्यांशी दराबाबत बैठक घेणार आहे.

-किसनशेठ भिलारे, चेअरमन, महाबळेश्वर फळे- फुले सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : शिरुरमधून अमोल कोल्हे ९ हजार तर विशाल पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर, पुण्यातून रविंद्र धगेंकरांनी घेतली आघाडी

India Lok Sabha Election Results Live : तुफानी सुरुवातीनंतर भाजपाची गती मंदावली, इंडिया आघाडीकडून कडवी टक्कर... काय आहे तासाभराचे कल?

Lok sabha Election 2024 : EVM मशिनमध्ये कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? हे मतमोजणीपूर्वी कसे तपासले जाते? घ्या जाणून

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचा धुव्वा ; ॲनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडाची प्रभावी गोलंदाजी

Lok Sabha Election 2024: लोकसभेत विरोधी पक्ष कसा निवडला जातो अन् विरोधी पक्ष नेत्याला कोणते लाभ मिळतात? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT