शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाणार आहे.
सातारा - जिल्हा परिषद शाळांमधील (Satata Zp School) विद्यार्थ्यांना (Student) सात महिन्यांचा पोषण आहार (Nutritional Diet) एकत्रित मिळणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या तीन हजार ४२० शाळांमधील सुमारे दोन लाख ५६ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहारातील तांदूळ, कडधान्यांसह डाळींचे वाटप होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाणार आहे. शासन स्तरावर शालेय पोषण आहार पुरवठादार अंतिम झाला नसल्याने शालेय पोषण आहाराचे वाटप लांबणीवर पडले होते. जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलैअखेर शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. शासन नियमानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळांना पोषण आहार वाटप केला जातो. त्यामध्ये जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, अंशत:अनुदानित नगरपालिका अशा सुमारे तीन हजार ४२० शाळांचा समावेश आहे.
पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला प्रतिदिन १०० ग्रॅम, सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांला प्रतिदिन १५० ग्रॅम तांदूळ मिळणार आहे. याशिवाय पाचवी, सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना कडधान्ये व डाळी देण्यात येणार आहेत. पोषण आहाराचे पहिल्या टप्प्यात ८० दिवसांचे तर दुसऱ्या टप्प्यात ५४ दिवसांचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत कार्यवाही सुरू झाली आहे. संबंधित ठेकेदारामार्फत शाळा स्तरावर शालेय पोषण आहार पोचविण्याचे काम सुरू झाले आहे. शाळास्तरावरूनही विद्यार्थ्यांना त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मसूर, तूर, मूग यापैकी एक डाळ, तर हरभरा, मीठ, चवळी, मूग, वाटाणा यापैकी एक कडधान्य असा आहार असणार आहे. याबाबत कोणते कडधान्य द्यावे, याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत. त्यानुसार विनय गौडा यांच्या मान्यतेने मूगडाळ व हरभरा हा पोषण आहार जिल्ह्यासाठी ठरविण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात दोन टप्प्यांत शालेय पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. त्यानुसार सर्व शाळांमध्ये पोषण आहार वाटपाची कार्यवाही सुरू आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत पोषण आहाराचे वाटप पूर्ण होईल.
- धनंजय चोपडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.