Sushant Jagdale esakal
सातारा

दहाव्यात अपयश, अकराव्या प्रयत्नांत बाजी; सूर्याच्यावाडीचा सुशांत 'सूर्या'सारखा तळपला!

प्रकाशमान किरणांनी अवघे घरदार अन्‌ सूर्याचीवाडीचा आसमंत उजळून निघाला.

संजय जगताप - सकाळ वृत्तसेवा

मायणी (सातारा) : अठराविश्व दारिद्य्र अन्‌ वारंवार पदरी पडणाऱ्या अपयशाने खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर तो अखेर सूर्यासारखा तळपला. त्याच्या प्रकाशमान किरणांनी अवघे घरदार अन्‌ सूर्याचीवाडीचा आसमंत उजळून निघाला. सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील सुशांत महादेव जगदाळे यांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत लखलखीत यश मिळवून कष्टणाऱ्या आई- बाबांचे पांग फेडले. सुशांतची ही यशोगाथा तरुणांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

आई-वडिलांचे शिक्षण प्राथमिक स्तरापर्यंतच झालेले. 17 व्या वर्षीच त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. गिरणी कामगार म्हणून महिन्याकाठी मिळणाऱ्या दोन-अडीचशे रुपयांत संसाराचा गाडा चालविताना तारांबळ उडायची. आईने घरखर्चाला हातभार लावण्यासाठी गारमेंट्‌सला पिशव्या शिवून देण्याचे काम करत. सुशांतला त्यांनी गावाकडेच आजोबांबरोबर ठेवले होते. दिवाळी सणालाही नवीन कपडे मिळत नसत. हट्ट करताच आजोबा त्यांच्या फेट्याचे शर्ट शिवून नातवंडांना घालायला देत. दरम्यान, गिरणी बंद पडल्यामुळे वडील गावी आले. पालकांनी दोन मुलांचे पालनपोषण, शिक्षण मोठ्या जिद्दीने केले.

सुशांतचे गावात प्राथमिक शिक्षण झाले. मायणी व विट्यात उच्च शिक्षण घेतले. बारावीत असताना सुशांतने सीए होण्याचा निर्धार केला होता. नियमित कॉलेज करीत त्याने सीए परीक्षेचा अभ्यासही सुरू केला. सातारा येथील क्‍लास जॉइन करून अभ्यास केला. तब्बल आठ वर्षे तो सीएची परीक्षा देत होता. अपयश येताना सतत धीर देऊन सुशांतला आई- वडील पुन्हा लढण्याचे बळ देत असत. त्याने पुण्याला जाऊन सीएचा अभ्यास करण्याचे ठरवले. दहाव्या प्रयत्नावेळी दोन गुणांसाठी अपयश आले आणि आता सीए होण्याचा नाद सोडावा, अशी त्याची मानसिकता होऊ लागली. पण, आईने पुन्हा एकदा त्यास धीर देत प्रयत्न करण्यास सांगितले. पूर्ण तयारीनिशी त्याने परीक्षेचा सामना केला आणि अकराव्या प्रयत्नांत त्याने बाजी मारली.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT