swabhimani shetkari sanghatna sakal media
सातारा

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा; 'स्वाभिमानी'ची मागणी

जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखाने चालू हंगामात सुरु करण्यास सक्षम नसल्याने कारखानदारांची आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांना माहिती द्या

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखाने चालू हंगामात सुरु करण्यास सक्षम नसल्याने कारखानदारांची आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांना माहिती द्या. तसेच, मागील हंगामातील ऊस बिले जमा नसतानाही बिले दिल्याची खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना आज निवेदनाद्वारे केली आहे.

या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, मनोहर येवले आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील साखर कारखान्याने चुकीच्या निर्णयामुळे, नियोजनामुळे या वर्षी गळीत हंगाम घेतील अथवा नाही याबाबत शेतकर्‍यांना, सभासदांना शंका आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही कारखान्यांची इतर यंत्रणामार्फत चौकशी चालू असल्याने हे कारखाने चालु होतील अथवा या वर्षीचा गाळप हंगाम चालू करण्याबाबत बैठक घेऊन आपली भूमिका जाहीर करावी.

तसेच, ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसबिले दिले नाही, अशा कारखान्याची खोटी माहिती वरिष्ठ कार्यालयात देऊन १०० टक्के ऊसबिले दिल्याचे खोटे दाखविले असून अहवालातही दिसत आहे. परंतु, वस्तुस्थिती वेगळी असून अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसबिले दिलेले नाही. त्यामुळे खोटी माहिती साखर लेखा विभागाने देऊन शेतकऱ्यांच्या बरोबर शासनाची फसवणूक केली आहे. त्या विभागातील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी श्री. शेळके यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचा बनावट जवळचा सहकारी.. ३ वर्षे होता तुरुंगात... सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय केला रद्द, काय आहे प्रकरण?

Nanded News: 'नीट' पेपरफुटी प्रकरणी संघटना आक्रमक छावा विद्यार्थी आघाडी व एसएफआयकडून तीव्र संताप

LPG Subsidy Rules : एलपीजीबाबत नवे नियम लागू, आता 'या' लोकांना मिळणार नाही सिलिंडर, नेमकं काय बदललं?

Nanded News: जुन्या नांदेडमधील अतिक्रमण हटविले इतवारा, बर्की चौक परिसराने घेतला मोकळा श्वास

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील मोटेगावकरांविरोधात शिवसेना-युवा सेनेचा संताप; वर्गाबाहेर जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT