ccc. esakal
सातारा

सातारा : तालुकानिहाय कोविड सेंटर उद्यापासून सुरू होणार

जिल्ह्यात बाराशे बेड उपलब्ध; संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेऊन तयारी

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात मागील पाच महिन्यांपासून कोरोना आलेख(corona update) कमी झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे बाधित व संशयित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बुधवार (ता. १२) जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर (Covid care center) सुरू होणार असून, त्या माध्यमातून एक हजार २०० बेड उपलब्ध होणार आहेत.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाशी सामना केला जात आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला होता. याप्रसंगी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यात एकूण २६ सीसीसी सुरू केले होते.

दरम्यान, ऑक्‍टोबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रित आल्याने जिल्ह्यात केवळ एका ठिकाणी कोविड सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्या कालावधीत नागरिकांना बेड अपुरे पडू लागल्याने पुन्हा आठ सीसीसी सुरू करण्यात आले. जुलै महिन्यापासून कोरोनाची संख्या घटू लागली होती. जिल्ह्यात दररोज सरासरी २५ ते ४० पर्यंत रुग्णसंख्या आढळत होती. मात्र, डिसेंबर २०२१ पासून जिल्ह्यातील संख्या झपाट्याने वाढू लागली असून, संक्रमणाचा दरही दहा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने बंद केलेले सीसीसी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण व संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून उपचारासाठी सुविधा दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात ३१ ‘सीसीसी’ची तयारी पूर्ण

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, कोरोनाचा पुढील संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात ३१ सीसीसी सुरू करण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढल्यास तत्काळ उपचार मिळणे सोयीचे ठरणार आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने बंद असलेले कोविड सेंटर प्रत्येक तालुक्यात सुरू केले जाणार आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण बाराशे बेड उपलब्ध होणार आहेत.

- डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT