anil vaychal system
सातारा

खवळलेल्या समुद्रात दहा तास चाललेली जगण्याच्या लढाई जिंकली...

आज या जिवावरच्या प्रसंगात नशीब आणि सर्वांच्या आशीर्वादाचे पाठबळ कामी आले, अशी प्रतिक्रिया अनिल वायचळ यांनी ई- सकाळशी बोलताना व्यक्त केली.

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : तौक्‍ते चक्रीवादळामुळे (tautkae cyclone) खवळलेल्या समुद्रात बार्ज बुडाल्याने पाण्यात उडी घेतलेल्या वायचळवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथील अनिल निवृत्ती वायचळ यांनी डोंगरा एवढ्या लाटांशी (waves) धाडसाने दिलेली झुंज अखेर यशस्वी ठरली. लाईफ जॅकेटच्या (life jacket) साह्याने तब्बल नऊ तास समुद्रात तरंगत पडलेल्या वांग खोऱ्याच्या मातीतला या शेरदिल सुपुत्राची नौदलाच्या (navy) पथकाने सुखरूप सुटका केली अन्‌ गेले तीन दिवस डोळ्यात प्राण आणून त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. (tautkae cyclone indian navy saved life satara trending news)

अनिल वायचळ हे मुंबईत अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लॅंटवर या कंपनीचे काम सुरू असल्याने सहकाऱ्यांसमवेत ते तिकडे ड्युटीवर होते. त्या सर्वांना चक्रीवादळाबाबत संदेश प्राप्त झाला होता. मात्र, ते ज्यावर थांबलेले होते ते बार्ज मजबूत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांना वाटत नव्हते. सोमवारी (ता. 17) त्यांनी मोबाईलवरून घरच्यांना मेसेज केला आणि त्यानंतर त्यांचा संपर्कच तुटला.

वादळामुळे समुद्र खवळल्याने उंचच उंच लाटा उसळू लागल्या अनिल व त्यांचे सहकारी थांबलेल्या बार्जमध्ये पाणी घुसल्याने पाचच्या सुमारास त्यांना लाईफ जॅकेटसह पाण्यात उड्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या घेताना काही जण अडकून भरकटले, तर काही एकमेकांचे हात पकडून पाण्यावर तरंगत राहिले. दहा तास त्यांची जणू जगण्या मरण्याची लढाईच लढली. रात्री अडीच वाजता नौदलाचे बचाव पथक पोचल्यावर त्यांना बोटीवर घेऊन नंतर किनाऱ्यावर आणण्यात आले.

बुधवारी ता. 19 सायंकाळी सहा वाजता ते घणसोली मुंबई येथील घरी परतल्यावर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या कुटुंबीय व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. या वेळी सर्वांचेच डोळे आनंदाश्रूनी डबडबले होते. धाडस तर पूर्वीपासून होतेच; पण आज या जिवावरच्या प्रसंगात नशीब आणि सर्वांच्या आशीर्वादाचे पाठबळ कामी आले, अशी प्रतिक्रिया अनिल वायचळ यांनी ई- सकाळशी बोलताना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT