Akalpe Village esakal
सातारा

होय, माणुसकी अजून जिवंत आहे! दोन दिवस रस्त्यात खितपत पडलेल्या वृद्धास 'जीवदान'

शिवसागरापलीकडे असलेले कादांटी खोरे हा जिल्ह्यातील दुर्गम परिसर म्हणून सर्वपरिचित आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शिवसागरापलीकडे असलेल्या अत्यंत दुर्गम भागात दोन दिवस अन्नपाण्याविना असलेल्या वृद्धास ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जीवदान लाभले. या वेळी शिक्षकांनी दाखविलेले प्रसंगावधानही महत्त्वपूर्ण ठरले. (Teachers Gave Life To The Citizens Of Akalpe Village Satara News)

शिवसागरापलीकडे असलेले कादांटी खोरे हा जिल्ह्यातील दुर्गम परिसर म्हणून सर्वपरिचित आहे. घनदाट जंगलाबरोबरच सोई-सुविधांचा अभाव हे येथील वैशिष्ट्य मानले जाते. याच परिसरातील आकल्पे (ता. महाबळेश्वर) येथे ही घटना घडली. त्यात माणुसकीच्या प्रयत्नांतून कोंडीबा गोविंद आखाडे ही वयोवृद्ध व्यक्ती मरणाच्या वाटेवरून सुखरूप परत आली. आखाडे हे डोंगरउंचावरील निवळी मुरा या गावातील रहिवासी. आकल्पे गावाकडे येत असताना मध्येच चक्कर येऊन ते जागेवर कोसळले. दोन दिवस ते तेथेच अन्नपाण्याविना पडून होते. निर्जन परिसरामुळे याबाबत कोणालाही माहिती नव्हती. त्यानंतर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गावातील मुलांनी ही घटना विनोद कुमठेकर, नितीन घोरपडे या शिक्षकांना सांगितली.

त्यानंतर हे दोघेही ग्रामस्थांसह घटनास्थळी पोचले. मग आखाडे यांना झाडाखाली आणून जेवण देण्यात आले. माजी सरपंच यशवंत सावंत यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. तापोळा येथील आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांच्यावर जागेवरच उपचार करण्यात आले. या कामी पाचगणीतील बेल एअर रुग्णालयात आरोग्य सहायक म्हणून काम करणाऱ्या अमृत कदम यांच्यासह नामदेव सावंत, यशवंत सावंत, जावजी सावंत यांनी मोलाची कामगिरी बजाविली. पुढे आकल्पेतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आणून उपचार केल्यानंतर आखाडे यांच्यावरील संकट टळले. ग्रामस्थांचे योगदान अन्‌ शिक्षकांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

कुमठेकरांची बांधिलकी

विनोद कुमठेकर हे कोविड लसीकरणासाठी आकल्पेत वास्तव्यास आहेत. गावातील अनेक आजारी व्यक्तींना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून रस्ता दुरुस्तीच्या कामातही त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचेही विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Teachers Gave Life To The Citizens Of Akalpe Village Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT