सातारा

थदाळे सोसायटीचा शिपाई तब्बल 57 महिने पगारापासून वंचित! 

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : थदाळे (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटीकडून 57 महिन्यांचा पगार मिळाला नसून सोसायटीच्या सचिवांनी त्या पगाराचा अपहार केल्याची तक्रार थदाळे सोसायटीचे शिपाई तात्याबा सोनबा जाधव यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून 57 महिन्याचा पगार मिळावा व संबंधितावर कारवाई व्हावी, अन्यथा थदाळे विकास सेवा सोसायटीच्या कार्यालयासमोर 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थदाळे (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटीमध्ये गेले 15 वर्षापासून शिपाई म्हणून तात्याबा सोनबा जाधव खासगी नोकरी करत आहेत. त्यांना सोसायटीतून तीन हजार रुपये मानधन मिळत होते. गरीब परिस्थितीमुळे यावरतीच त्यांचे कुटुंब चालत आहे. मात्र, 1 जानेवारी 2016 रोजी ते 25 ऑगस्ट 2020 या 57 महिन्यांच्या कालावधीतला पगार विकास सेवा सोसायटी थदाळे यांच्याकडून दिला गेला नाही.

याबाबत ते विकास सेवा सोसायटी कार्यकारी मंडळातील चेअरमन अर्जुन श्रीपती कुंभार, सचिव बापुराव मुगुटराव देवकर व संचालक बॉडीतील सदस्यांना वारंवार विचारपूस करत होते. तुम्हाला पगार देण्याचा विचार करु, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे ते थकीत पगार रक्कम मिळेल या आशेवर अनेक दिवस होते. विकास सेवा सोसायटीचे सचिव बापुराव मुगटराव देवकर यांनी तुमचा पगार करण्याचे कारण सांगत, तसेच पगारामध्ये अपहार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या करुन घेतल्या. याबाबत त्यांनी अधिक खुलास केला असता, तुम्हाला कामावरुन काढून टाकण्यात येईल व थकीत पगार विसरून जा, अशी धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

थदाळे विकास सेवा सोसायटीत काम करत असताना त्यांनी लोकसभा निवडणूक सन 2018 व 2019 मध्ये इलेक्शन ड्युटी बजावली आहे. तसेच शासकीय सेवेत ही मदत केली आहे. तरीही सोसायटीचे सचिव व कार्यकारी मंडळांनी त्यांना पगारापासून वंचित ठेवले आहे. या पगारावर त्यांचे कुटुंब चालत होते. आजपर्यंत थकित पगार मिळेल या आशेवर होते. मात्र, पगारापासून वंचित ठेवल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

या प्रकरणामुळे मला नैराश्य आले असून माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे. मला माझा 57 महिन्यांचा पगार न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तरी पुढील होणाऱ्या परिणामास सर्वस्वी विकास सेवा सोसायटीचे सचिव व पदाधिकारी जबाबदार राहणार असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रति त्यांनी सहायक निबंधक सातारा, जिल्हा पोलीस प्रमुख, सहायक निबंधक दहिवडी व विकास सेवा सहकारी सोसायटी लि., थदाळे यांना दिल्या आहेत.

..म्हणून मी आत्मदहनाचा निर्णय घेतलाय
सोसायटीत मी गेली 15 वर्षापासून काम करत आहे. मी 2016 लाच सेवानिवृत्त झालो, असे सचिव सांगत आहेत. मग कामावर नसताना मला सन 2018-19 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कशी ड्युटी दिली गेली. मला जाणीवपूर्वक पगारापासून वंचित ठेवण्याचे पाप सोसायटीचे सचिव व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मी गरीब असून कोणाचीही साथ मिळत नाही, मला न्याय मिळत नाही. त्यामुळे मी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे.
-तात्याबा जाधव, शिपाई थदाळे सोसायटी (ता. माण)

माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे
तात्याबा जाधव यांना 1 जानेवारी 2016 रोजी साठ वर्षे पूर्ण झाल्याने ते सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे त्या पुढील त्यांच्या पगाराचा संबंधच राहिला नाही. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. 
-बापुराव देवकर, सचिव थदाळे सोसायटी (ता. माण)

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT