Car
Car esakal
सातारा

पुण्यातील कुटुंबाचं नशीब बलवत्तर! 400 फुट खोल दरीत कोसळणारी कार अडकली झाडात

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : येथील पसरणी घाटात (Pasrani Ghat) वाईहून पाचगणीला जाणारी मोटार आज दरीत (Valley) कोसळताना वाचली. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. सदर मोटार संरक्षक काठड्यापासून काही अंतरावर असलेल्या झाडात (Tree) अडकली, अन्यथा तीन-चारशे फूट खोल दरीत गेली असती. गाडीतील सर्वजण सुरक्षित आहेत. (The Car Got Stuck In A Tree In Wai-Pasarni Ghat Satara Marathi News)

वाई येथील पसरणी घाटात वाईहून पाचगणीला जाणारी मोटार आज दरीत कोसळताना वाचली.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, पाचगणीत स्थायिक असलेले पुण्यातील कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त आज मोटार (क्र. एमएच १२ ओटी ६६७२) यामधून वाईला आले होते. काम संपवून दुपारी पसरणी घाटातून पाचगणीला जाताना सोळा नंबर स्टॉपजवळ मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि घाटातील धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात आले नाही. त्यामुळे मोटार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली आणि काही फूट अंतरावर झाडाला अडकली, अन्यथा मोटार तीन-चारशे फूट खाली दरीत कोसळली असती.

या अपघातात (Accident) कोणीही जखमी झाले नाही. मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. मोटारीत एक पुरुष व दोन महिला होत्या. मात्र, नशीब बलवत्तर म्हणूनच गाडीतील सर्वांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटात धाव घेतली. क्रेनच्या साह्याने मोटार बाहेर काढण्यात आली. अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.

The Car Got Stuck In A Tree In Wai-Pasarni Ghat Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT