Satara Sakal
सातारा

कऱ्हाड पालिकेची बिल थकीत गेल्याने वीज कनेक्शन तोडले

पालिकेवर वीज कनेक्शन तोडण्याची नामुष्की ओढावली

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पालिकेच्या (Municipal) मुख्य कार्यालयाचे वीज बील (Light Bill) थकीत असल्याने त्याचे वीज कनेक्शन वीज कंपीनीने (Company) आज तोडले आहे. मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार तर ड्रेनज (drainage) विभागाच्या पंपीग स्टेशनटे सात लाख ९१ हजारांचे बील थकीत आहे. त्यामुळे कार्यालयासहीत पंपीग स्टेशन क्रमांक तीनचे वीज कनेक्शन तोडले आहे. पालिकेच्या अन्य प्रकल्पांचेही थकीत वीज बीलांचे कनेक्शनचेही तोडण्यात येणार आहे, अशी माहिती वीज कंपनीचे सहायक अभियंता बाबासाहेब पवार (Babasaheb Pawar) यांनी दिली. पालिकेचा कालच शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव साजरा झाला.

त्यानंतर पालिकेवर वीज कनेक्शन तोडण्याची नामुष्की ओढावली असल्याने त्याची शहरात जोरदार चर्चा आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार ५५० रूपयांचे वीज बील पालिका देणे बाकी आहे. शहरातील ड्रेनेज विभागाच्या पंपीग स्टेशनचीही वीज बीले थकीत आहेत. त्यासहीत अन्य ठिकाणची थकीत रक्कम सात लाख ९१ हजारापर्यंत आहे. पालिकेकडे महिनाभरापासून वीज कंपनी बीलाच्या वसुलीसाठी तगादा लावला होता. मात्र ती बील भण्यास पालिका टाळाटाळ करत होती. अखेर आज पालिकेचे वीज कनेक्सन बील न भरल्याने तोडण्यात आले.कार्यालयातील तब्बल एक लाख ४७ हजांरांची वीज बीलाची मागणी केली. ती दिल्याने मुख्य कार्यालयातील वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. त्यामुळे तेथील सर्व यंत्रणा काही काळ बंद पडली होती. मात्र नंतर पालिकेच्या जनरेटवर तेथील कारभार सुरू होता. ड्रेनेज विभागाच्या पंपींग स्टेशनचेही वीज केनक्शन वीज कंपनीने तोडले आहे. पंपीग स्टेशन क्रमाक तीनचे वीज कनेक्शन तोडल्याने तेथील यंत्रणा बंद आहे.

तेथील पंपीग स्टेशनचे तब्बल सात लाख ९१ हजारांचे वीज बील थकीत आहे. त्यामुळे तेथील वीज केनक्शन बंद करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला. त्यासह अन्य पंपीग स्टेशनचेही वीज कनेक्शन टप्प्या टप्प्याने बंद केले जाणार आहे. शहरातील पालिकेच्या सर्व विभागाचे मिळून जवळपास सात लाख ९१ हजारांचे महिन्याचे बील थकीत आहे. त्यात स्टेडीयम स्ट्रीट लाईट, जलशुद्धीकरण केंद्र, पंपीग स्टेशन, अन्य यंत्रणेचाही त्या थकीत बीलात समावेश आहे. तीही बीले पालिकेने न भरल्यास तोडण्याची प्रक्रीया राबवली जाणार आहे, असे वीज कंपनीतून सांगण्यात आले.

पालिकेच्या पंपीग स्टेशनचे सात लाख ९१ हजार तर मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार ५५० रूपांयची वीज बील थकीत होती. वारंवार मागणी करूनही ती बीले पालिकेने भरली नाहीत. सातारा येथूनही त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न झाले. मात्र ती बीले भरली न गेल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कार्यावाही झाली आहे.

- बाबासाहेब पवार, सहायक अभियंता, वीज कंपनी कऱ्हाड

पालिकेच्या कार्यालयासह पंपींग स्टेशनचे वीज बील थकीत आहे. मात्र ते फारच जुने थकीत नाही. मागील महिन्यापासूनचे थकीत आहे. तरिही वीज कंपनीने कनेक्शन तोडण्याची कार्यावाही कशी केली, याचे आश्चर्य वाटते. वीज बील भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तीही पूर्ण होईल.

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : राज्यात विविध कार्यक्रमांसह आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार

Afghanistan–Pakistan War: अफगाण-पाक संघर्षाने घेतलं भीषण रूप! 15 चौक्या ताब्यात, 55 सैनिक ठार, सीमेवर रक्तरंजित संग्राम…

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT