सातारा

धोकादायक परिस्थिती! वर्ये पुलावरील तुटला लोखंडी संरक्षक बार

- प्रशांत गुजर

पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व जवळचा मार्ग असल्याने या ठिकानाहून मोठी वाहतूक होत असते.

सायगाव (सातारा): सातारा ते पुणे या मार्गावरील वर्ये येथील असणाऱ्या ब्रिटिश कालीन पुलावरील सरक्षक लोखंडी बार तुटल्याने व येथील वाढलेल्या झाडा झुडपामुळे धोकादायक परिस्थिती बनल्याने हा पुल डेंजर झोन बनला आहे.

पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व जवळचा मार्ग असल्याने या ठिकानाहून मोठी वाहतूक होत असते. तसेच आजुबाजुचे गावातील देखील दररोज हजारो वाहने या मार्गाने ये-जा करत असतात. तीन वर्षापूर्वी येथील वाहतूक सहा महिने बंद ठेवून या ब्रिटिश कालीन पुलाचे बांधकाम काम पूर्ण केले होते, या पुलावर असणारे दगडी सरक्षक भिंती काढून या ठिकाणी लोखंडी सरक्षक बार बसविण्यात आले होते. मात्र गेली वर्ष झाले या ठिकाणी नेमक्या मोठ्या असणाऱ्या वळणावर सातारा दिशेने येताना डाव्या बाजुचे संरक्षक बार निसटले आहेत. तर त्या ठिकाणी वाढलेल्या झाडा झुडुपामुळे अनेक ठिकाणी तुटलेले बार दिसून येत नसल्याने मोठ्या व छोट्या वाहनचालकासाठी अत्यंत धोक्याची परिस्थिती बनली आहे.

या ठिकानाहुन अनेकदा यापूर्वी देखील येथून दुचाकी वाहने पुलावरुन खाली पडून गंभीर अपघात घडले आहेत. मात्र तरीही सबंधित विभाग याकडे अजुनही दुर्लक्ष करत आहे, एखादी मोठी घटना घडण्याची शक्यताही येथील परिस्थिती पाहता नाकारता येत नाही, पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या संरक्षक बार भोवती मोठ मोठी झाडे झुडुपे देखील वाढली असल्याने संरक्षक बार दिसेनासे झाले आहेत, त्यामुळे येथे हा स्पॉट डेंजर झोन बनला आहे, लवकरात लवकर येथील संरक्षक बारची दुरुस्ती करून वाढलेली झुडुपे काढावी अशी मागणी पानमळेवाडीचे पोलिस पाटिल राजेन्द्र गोरे, उमेश मोरे, दीपक फरांदे, प्रमोद इंगवले, मनोज इंगवले, शिवाजी शिवनकर, सुभाष पाडळे, जयदेश जगताप, शशिकांत भोसले या वाहन चालकांनी केली आहे.

हा अत्यंत महत्वाचा मार्ग असून या पुलावर या संरक्षक बार नसल्याने अनेक अपघात देखील घडले असून या गंभीर असणाऱ्या गोष्टी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे, तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी.

- अनिकेत (चंदू) पवार, युवा नेते आनेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT