leopard  Canva
सातारा

कऱ्हाडातील विंग, पोतले, जखीणवाडीत बिबट्याची दहशत

विलास खबाले

या घटनेने त्या परिसरात भितीचे वातावरण आहे.

विंग (सातारा): परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, पोतले ( ता. कऱ्हाड) येथे हल्ला चढवून त्याने एका शेळीस ठार मारले. या घटनेने त्या परिसरात भितीचे वातावरण आहे.

विंगसह परिसरात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे सत्र अद्याप सुरूच असून, पशुधन वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्‍हान निर्माण झाले आहे. शनिवारी मध्यरात्री पोतलेत पाटीलमळा येथील जनावराच्या शेडमध्ये हल्ला त्याने केला. साडेचार फूट भिंतीवरून आत प्रवेश करताना एका शेळीस ठार मारले. तेथील संभाजी शामराव पाटील यांची शेळी होती. सकाळी प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती वन विभागाला त्यानंतर दिली. घटनेचा पंचनामा वन कर्मचाऱ्यांनी केला आहे.

तत्पूर्वी त्या परिसरात शेळ्यांच्या कळपावर पंतोजीबुवा मळ्यात हल्ला त्याने केला होता. तोही दिवसाढवळ्या, त्यास चारच दिवस उलटले असून, तोवर दुसऱ्या हल्ल्याच्या घटनेने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, विंग येथे जनावरे चारायला गेलेल्या एका शेतकऱ्यासमोर बिबट्या अचानक प्रकटला. उसाच्या शेतातून तो अचानक बाहेर आल्याने म्हैस त्यामुळे बिथरली. तिच्या गळ्यातील दोरीचा हिसका शेतकऱ्याच्या हाताला बसल्याने ते कोसळून खाली पडले. किरकोळ जखमी ते झाले आहेत. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. विविध परिसरात बिबट्याचा वावर नित्याचाच बनला आहे. विशेषतः उसात रोजंदारीवर जायला महिला अक्षरश: घाबरत आहेत.

जखीणवाडीत बिबट्याचा गोठ्यातील जनावरांवर हल्ला

मलकापूर: जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथे शेतकऱ्यांचा पाठलाग केलेली घटना ताजी असतानाच या परिसरात गेली तीन दिवस बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. बुधवारी कणसे मळा परिसरात हल्ला करून एक रेडकू ठार, तर शुक्रवारी जुने इरिगेशन परिसरात हल्ला करून एक म्हैस गंभीर जखमी केली आहे. गोठ्यात बांधलेल्या पाळीव जनावरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जुने इरिगेशन नावाच्या शिवारात तानाजी ज्ञानू पाटील यांच्या वस्तीवरील जनावरांच्या शेडात बांधलेल्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केला. या वेळी जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे आसपासचे नागरिक जागे झाले. त्यांच्या गोंधळामुळे बिबट्याने म्हशीला सोडून शेजारच्या उसात धूम ठोकली. या हल्ल्यात म्हशीच्या नरड्याचा चावा घेतल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. त्या जखमी रेडीवर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती कणसे व पाटील यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल ए. पी. सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT